पृथ्वी शॉ मागच्या मोठ्या काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. मात्र, सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या रॉयल लंडन वनडे कपमध्ये शॉ खेळत अशून त्याने बुधवारी (9 ऑगस्ट) जबरदस्त खेळी केली. शॉ याने लंडच्या या स्पर्धेत धुवाधार द्विशतक ठोकल्यानंतर माध्यमांमध्ये त्याची चांगलीच चर्चा झाली. या खेळीनंतर शॉने भारतीय संघातील आपल्या पुनरागमनाविषयी देखील प्रतिक्रिया दिली.
रॉयल लंडन कप 2023 (Royal London Cup 2023) मध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) नॉर्थहॅम्टनशायर (Northamptonshire) संघासाठी खेळत आहे. बुधवारी समरसेट (Somerset) संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात शॉ याने आपल्या संघासाठी अवघ्या 153 चेंडूत 244 धावांची वादळी खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 28 चौकार आणि 11 षटकार आले. भारतीय खेळाडूंच्या या धमाकेदार खेळीमुळे नॉर्थहॅम्टनशायर संघाला या सामन्यात 87 धावांनी विजय मिळाला. शॉने 81 चेंडूत शतक पूर्ण केले होते. तर 129 चेंडूत द्विशतक देखील पूर्ण केले. पृथ्वी शॉ याने यापूर्वी 2020-21 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये नाबाद 227 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता दुसऱ्यांदा त्याने द्विशतकीय खेळी केली आहे. त्याच्या या खेळीनंतर भारतीय संघातील पुनरागमनाविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वनडे कपमध्ये द्विशक ठोकल्यानंतर शॉ यालाही भारतीय संघातील पुनरागमनाविषयी प्रश्न विचारले गेले. यावर तो म्हणाला, “यात शंका नाही की अनुभवासाठी खेळत आहे. भारतीय संघाचे निवडकर्ते काय विचार करत आहेत, याचा मी विचार करत नाहीये. मला फक्त याठिकाणी चांगले प्रदर्शन करायचे आहे. सोबतच चाहते आणि सपोर्ट स्टाफसोबत चांगला वेळ घालवायचा आहे. नॉर्थहॅम्टनशायर संघाने मला संधी दिली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ते माझी काळजी घेत आहेत. याठिकाणी खेळताना मजा येत आहे.”
दरम्यान, पृथ्वी शॉ याने भारतीय संघासाठी पदार्पण जोरात केले होते. पण मागच्या मोठ्या काळापासून तो संघात आपली जागा बनवू शकला नाहीये. भारतासाठी आपला शेवटचा सामना शॉने जुलै 2021 मध्ये खेळला होता. (After scoring a double century in London, Prithvi Shaw reacts on his return to the Indian team)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूची संपत्ती फक्त ‘एवढीच’, आकडा विराटच्या निम्म्या संपत्तीपेक्षाही कमी
‘इज्जत वाचली पाहिजे बास…’, भारतीय संघाच्या मियामीतील व्हिडिओवर नेटकऱ्याची लक्षवेधी कमेंट