---Advertisement---

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा आयसीसीला मोठा सल्ला

On: मंगळवार, जून 12, 2018 5:50 PM
---Advertisement---

10 जूनला पार पडलेल्या स्काॅटलँड विरुद्ध इंग्लंड सामन्यात स्काॅटलँडने विजय मिळवुन धक्कादायक निकाल नोंदवला. या विजयानंतर अनेकांनी स्काॅडलँडचे कौतुक केले.

मागील काही दिवसांपासून नवोदित संघानी चांगली प्रगती केली असल्याचे दिसुन आले आहे. त्यात स्काॅटलँडचा विजय, अफगाणिस्तानचा बांग्लादेशवरील विजय यामुळे तर ही गोष्ट प्रकर्षाने सर्वांच्या लक्षात आले आहे.

त्यामुळे या संघांना मोठ्या संघांविरुद्ध खेळण्याची संधी मिळायला हवी अशी इच्छा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने व्यक्त केली आहे.

याबद्दल ट्विट करताना सचिनने म्हटले आहे की “क्रिकेटमध्ये एक जागतिक खेळ बनण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत. अफगाणिस्तान, स्काॅटलँड, आयरलँड अशा संघांमध्ये प्रचंड क्षमता आहे.बाकी संघांप्रमाणेच त्यांना अनुभवी संघांविरुद्ध खेळण्याची संधी मिळायला हवी. त्यांना पुढे आणण्यासाठी हा योग्य मार्ग आहे.”

सध्या आयसीसीने 2019 च्या विश्वचषकात अव्वल 10 च संघ खेळवण्याच्या निर्णयावर टिका होत आहे. त्यातच सचिनच्या ट्विटमुळे आयसीसीच्या या निर्णयाच्या विरोधाला आणखी हातभार लागला आहे.

स्काॅडलँडला मिळाला आत्मविश्वास तर इंग्लंडला धक्का:

10 जूनला पार पडलेल्या स्कोटलँड विरुद्ध इंग्लंड सामन्यात स्कोटलँडने 371 धावांचे रक्षण करताना इंग्लंडला 6 धावांनी पराभूत केले. या विजयामुळे त्यांना 12 जूनपासून पाकिस्तानविरुद्ध सुरू होणाऱ्या टी20 मालिकेसाठी आत्मविश्वास मिळाला आहे.

मात्र इंग्लंडसाठी हा पराभव मोठा धक्का ठरला आहे. त्यांची 13 जूनपासुन आॅस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे या मोठ्या मालिकेआधी झालेला हा पराभव त्यांना सलत असेल.

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय गोलंदाजामुळेच भारतीय संघ येणार कसोटी सामन्यात अडचणीत!

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय फलंदाजांसाठी ही आहे मोठी बातमी

विजेतेपदाची आठवण म्हणून बनवुन घेतला चक्क टॅटू

टीम इंडियातून फिटनेसमुळे संजू सॅमसन आऊट, हा मोठा खेळाडू इन!

फिटनेसच्या कारणावरुन मोहम्मद शमीला भारतीय संघातून वगळले, या खेळाडूला मिळाली संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment