इंग्लंड क्रिकेट संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतात आला आहे. पण मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याआधी संघ यूएईमध्ये जाऊन आला. दुसऱ्या कसोटी सामन्यांतर संघाकडे मोकळा बेळ होता, जो त्यांनी यूएईमध्ये घालवला. पण राजकोट कसोटीसाठी संघ पुन्हा भारतात आल्यानंतर त्यांचा फिरकी गोलंदाज रेहान अहमद याला अडचणीचा सामना करावा लागला.
इंग्लंड क्रिकेट संघ सोमवारी (12 फेब्रुवारी) यूएईमधून पुन्हा भारतात दाखल झाला. राजकोट विमानतलावर रेहान अहमद (Rehan Ahmed) याला विजाची अडचण उद्भवली. त्याला विमानतलावरील दोन तास थांबून ठेवले गेले. कारण त्याच्याकडे असेलल्या विजावर एकदाच प्रवेश करण्यासाठी होती. पण दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर रेहान संघातील इतर खेळाडूंसोबत यूएईला गेला आणि सोमवारी पुन्हा भारतात परतला. अशाप्रकारे त्याने भारतात येण्याची ही दुसरी वेळ होती. पण त्याच्याकडे असलेला विजा मात्र पहिलाच होता.
रेहान मागच्या 30 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा भारतात प्रवेश करत होता, म्हणून त्याला राजकोट विमानतळावर रोखले गेले. याठिकाणी त्याने दोन तास अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पण त्यानंतर राजकोट विमानतळावरील अधिकाऱ्यांनी त्याचा अपत्कालीन विजा दिला आणि विमानतळाबाहेर जाण्याचा मार्ग मोकळा केला. अधिकाऱ्याकडून मिळालेला अपत्काली विजा हा दोन दिवसांसाठीचा आहे. त्याआधी इंग्लंड क्रिकेट बोर्ड रेहानसाठी नवीन विजा काढण्याची धावपळ करत आहे.
रेहन अहमदसोबत राजकोट विमानतळावर घडलेल्या प्रकाराची माहीत एका बीसीसीआय अधिकाऱ्याकडून माध्यमांना दिली गेली. या अधिकाऱ्याने सांगितले की, “इंग्लंड संघाला विजासाठीची प्रक्रिया पुन्हा करण्याच्या सुचना केल्या गेल्या आहेत. पुढच्या दोन दिवसात ही प्रक्रिया केली जाईल. रेहान अहमदला संघातील इतर खेळाडूंसोबत देशात प्रवेश दिला गेला आहे. तो मंगळवारी (13 फेब्रुवारी) सराव करताना दिसेल.”
याआधी इंग्लंडचा युवा फिरकी गोलंदाज शोएब वशीर याच्यासोबद देखील असेच काहीचे घडले होते. बशीरला हैदराबाद विमानतळावरून विजासंदर्भात अडचण आल्यामुळे पुन्हा इंग्लंडला जावे लागले होते. (After Shoaib Bashir, now the problem of Rehan Ahmed’s visa! See why the spinner was stopped at Rajkot airport)
महत्वाच्या बातम्या –
Dattajirao Gaekwad । भारताच्या सर्वात वयस्कर क्रिकेटपटूचे निधन, वयाच्या ‘या’ वर्षी घेतला जगाचा निरोप
‘नेक्स्ट धोनी’ अशी ओळख असणारा सौरभ तिवारीची क्रिकेटमधून निवृत्त, मिळाली फक्त तीन वनडे खेळण्याची संधी