वनडे विश्वचषक 2023 संपला असून विश्वचषक संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळही संपला आहे. द्रविडकडे त्याचा कार्यकाळ वाढवण्याचा पर्याय असला तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रविडला आता हा जास्त प्रवास करायचा नाही आणि काही वेळ कुटुंबासोबत घालवायचा आहे. याच कारणामुळे तो भारतीय संघासोबतचा कार्यकाळ वाढवू इच्छित नाही.
मात्र, आता राहुल द्रविड (Rahul Dravid) आयपीएलच्या कोणत्याही एका संघात सामील होऊ शकतो, असा ताजा अहवाल समोर आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल द्रविड आयपीएलच्या एका संघासोबत दोन वर्षांच्या मोठ्या करारासाठी बोलणी करत आहे. ही बातमी खरी असेल तर पुढील आयपीएल हंगामामध्ये द्रविड पुन्हा आयपीएलमध्ये दिसू शकतो. भारतीय क्रिकेट संघासाठी राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ अप्रतिम राहिला आहे. 2021 च्या टी20 विश्वचषकानंतर तो संघात सामील झाला आणि पुढील दोन वर्षे संघात राहिला. त्यांच्या प्रशिक्षक पदाखाली भारतीय क्रिकेट संघ 2022 च्या टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. याशिवाय भारतीय संघ 2021-23 च्या आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही पोहोचली होती, जिथे त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
या दोन मोठ्या यशांशिवाय राहुल द्रविडने भारतीय संघाला 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत नेले, परंतु भारताला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासह द्रविडचा प्रशिक्षक कार्यकाळ संपला आणि आता त्याला जास्त प्रवास करायचा नाही, त्यामुळे भारतीय संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यात त्याला रस नाही.आता राहुल द्रविडची आयपीएल टीमशी बोलणी सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र द्रविडची आयपीएलच्या कोणत्याही संघाशी चर्चा होत असेल, तर ती कोणत्या संघाची असू शकते?
सध्या दिल्ली कॅपिटल्सकडे मुख्य प्रशिक्षक नाही, कारण त्यांचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय राजस्थान रॉयल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनीही संघाला सोडले आहे. याशिवाय राजस्थानचा गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगाही आता मुंबई इंडियन्सकडे गेला आहे. त्यामुळे या दोन संघांपैकी एकाशी द्रविडची चर्चा होण्याची शक्यता आहे.मात्र, द्रविडने राजस्थान रॉयल्ससोबत बराच वेळ घालवला आहे, त्याने या आयपीएल संघाचे नेतृत्वही केले आहे. अशा परिस्थितीत राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचा नवा मुख्य प्रशिक्षक होण्याची शक्यता आहे. (After Team India Dravid will be the head coach of this IPL team May be announced soon)
म्हत्वाच्या बातम्या
अरे… ये क्या हुआ! चेंडूवर वीज बनून कोसळला ख्रिस गेल, जोरदार चौकार मारताच बॅटचे झाले दोन तुकडे, Video
200 पेक्षा जास्त वनडे सामने खेळणारे भारतीय क्रिकेटपटू, ज्यांना एकही वनडे विश्वचषक जिंकता आला नाही