आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्सची ओळख आहे. सर्वाधिक पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई संघ यावर्षी देखील विजयासाठी प्रयत्न करत आहे. पण हंगामातील सलग दुसऱ्या सामन्यात शनिवारी (8 एप्रिल) मुंबईला पराभव स्वीकारावा लागला. चेन्नई सुपर किंग्जकडून मिळालेल्या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने वरिष्ठ खेळाडूंना पराभवासाठी जबाबदारी धरले.
मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ आमने सामने आले होते. आयपीएलच्या इतिहासातील या दोन सर्वात यशस्वी संघांमधील लढत पाहण्यासाठी चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणात मैदानात हजेरी लावली होती. पण मुंबईला आपल्या होम ग्राउंडवर सीएसकेकडून 7 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 157 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्ज संघाने 3 बाद 159 धावा केल्या आणि विजय मिळवला. रविंद्र जडेजा सामनावीर ठरला, ज्याने सीएसकेसाठी 20 धावा खर्च करून सर्वाधिक तीन विकेट्स नावावर केल्या. तसेच फलंदाजी विभागात अजिंक्य रहाणे यायने सर्वीधिक 61 धावांची खेळी केली. मुंबईचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही.
वरिष्ठ खेळाडूंनी अधिक जबाबदारी घेण्याची गरज – रोहित शर्मा
हंगामातील दुसरल दुसऱ्या सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, “वरिष्ठ खेळाडूंनी जबाबदारी घेतली पाहिजे, ज्यामध्ये मी स्वतः देखील सामील आहे. आयपीएल स्पर्धा कशा पद्धतीने खेळली जाते, हे आपल्याला माहिती आहे. असात संघाला कुठेतरी चालना मिळाली पाहिजे. असे होत नसेल तर परिस्थिती अवघड होऊ शकते. आतापर्यंत दोनच सामने झाले आहेत आणि हातातून सर्व गोष्टी गेल्या नाहीयेत. मात्र, वरिष्ठ खेळाडूंना चांगली फलंदाजी करावी लागेल. आयपीएलमध्ये असेच खेळावे लागते. तुम्ही एकदा जिंकू लागल्यानंतर एकसोबत अनेक सामने जिंकाल. प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने करण्याची इच्छा सर्वांचीच असते. पण ड्रेसिंग रूममधी रणनीतीप्रमाणे आम्ही प्रदर्शन करू शकलो नाही.”
तत्पूर्वी मुंबई इंडियन्सने हंगामातील आपल्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून 8 विकेट्सने पराभव स्वीकारला होता. सीएसकेचे या हंगामातील प्रदर्शन पाहिले, तर पहिल्या सामन्या सीएसकेने गुजरात टायटन्सकडून 5 विकेट्सने पराभव स्वीकारला होता, तर दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघावर 12 धावांनी विजय मिळवला. (After the defeat by CSK, Rohit Sharma expressed his displeasure with himself)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वानखेडेवर सीएसकेचा मुंबईला धोबीपछाड! ‘लोकल बॉय’ रहाणे-देशपांडे चेन्नईच्या विजयाचे नायक
“अनुभवी खेळाडूंनी जबाबदारी घ्यावी”, सलग दुसऱ्या पराभवानंतर रोहितचा संघसहकाऱ्यांना इशारा