---Advertisement---

पाकिस्तानात पराभवाचे पडसाद, आधी प्रशिक्षकांचा राजीनामा, आता क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी सोडले पद

On: शनिवार, जानेवारी 20, 2024 9:19 AM
Pakistan
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. भारतात खेळल्या गेलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात संघाच्या लाजिरवाण्या पराभवाचा गोंधळ थांबताना दिसत नाही. पाकिस्तानचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि संघ संचालक मिकी आर्थर यांच्या राजीनाम्यानंतर बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफ यांनीही आपले पद सोडले असल्याची माहिती आहे. पुढील उमेदवाराचा निर्णय त्यांनी पंतप्रधानांवर सोडला आहे.

पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा वादळ आले आहे. सध्याचे अध्यक्ष झका अश्रफ (Zaka Ashraf) यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला आहे. गेल्या वर्षी जूनमध्येच नजम सेठी यांच्या जागी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. झका अश्रफ यांना अवघ्या 7 महिन्यांत त्यांचे पद सोडावे लागले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लाहोरमध्ये झालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) व्यवस्थापन समितीच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर झका अश्रफ यांनी अचानक राजीनामा दिला. त्यांनी आपले पद सोडून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद सोडल्यानंतर झका अश्रफ म्हणाले, “पाकिस्तान क्रिकेटसाठी जे काही चांगले होईल त्यावरच मी काम करत होतो, परंतु सध्या ज्या प्रकारे परिस्थिती पाहिली जात आहे, त्यामुळे हा निर्णय आमच्यासाठी चांगला आहे.” काम करणे खूप कठीण आहे. आता माझ्या जागी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पुढचा चेहरा कोण असेल हे पंतप्रधान ठरवतील.”

शुक्रवारी (19 जानेवारी) रोजीच संघाच्या तीन परदेशी प्रशिक्षकांनी एकाच वेळी आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुष्टी केली आहे की, परदेशी प्रशिक्षक मिकी आर्थर, ग्रँट ब्रॅडबर्न आणि अँड्र्यू पुटिक यांनी राष्ट्रीय संघ आणि बोर्डासह त्यांच्या पदांचा राजीनामा दिला आहे.

भारतात खेळल्या गेलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर कर्णधार बाबर आझमला तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडावे लागले. इंझमाम उल हक यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीही स्पर्धेदरम्यानच बरखास्त करण्यात आली होती. (After the defeat in Pakistan first the resignation of the coaches now the president of the cricket board has resigned)

हेही वाचा

उमेश यादवची घातक गोलंदाजी, तिलक वर्माची झंझावाती खेळी, रोहित शर्माचा 5 विकेट्स घेत रणजीत धुमाकूळ
IND vs ENG: ‘भारताची फलंदाजी विराट-रोहितवर अवलंबून’, माजी इंग्लिश गोलंदाजाचं मोठं विधान 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---