---Advertisement---

शाहरुख खान बाद होताच केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरचे ‘किंग खान’ स्टाईल सेलिब्रेशन; Video व्हायरल

On: शनिवार, एप्रिल 2, 2022 5:05 PM
Shreyas-Iyer
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामातील ८ वा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये १ एप्रिलला पार पडला. या सामन्यात कोलकाताने पंजाब संघाला ६ विकेट्सने पराभूत केले. सुरुवातीला कोलकाता संघाची फलंदाजी बघून वाटले होते की, हा सामना पंजाब जिंकेल. परंतु, आंद्रे रसल याच्या फलंदाजीने काही वेळातच सामन्याचे रुप बदलून गेले आणि सामना केकेआरच्या नावे झाला. या सामन्यादरम्यानचा कर्णधार श्रेयस अय्यरचा सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो बाॅलिवूड सुपरस्टार शाहरुख खानसारखी(Shah Rukh Khan) एक्टींग करताना दिसत आहे. 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हातवारे करत बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या आयकाॅनिक पोजमध्ये सेलिब्रेशन करताना दिसला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, चाहत्यांना त्याचा हा व्हिडीओ खुप आवडल्याचे दिसत आहे.

पंजाब किंग्सचे जवळपास सर्व फलंदाज १ एप्रिलला झालेल्या या सामन्यात अपयशी ठरले, त्यांनी काही खास कामगिरी केली नाही, त्यामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान देशांतर्गत क्रिकेट तमिळनाडूकडून खेळणारा शाहरुख खान पंजाब संघाचा भाग होता. तो केकेआरचा गोलंदाज टीम साऊदीच्या गोलंदाजीवर आणि क्षेत्ररक्षक नीतीश राणाच्या हातून शून्य धावांवरच झेलबाद झाला. यानंतर श्रेयस अय्यरने कोलकाता संघाचा सहसंघमालक शाहरुख खानच्या आयकॉनिक पोजमध्ये सेलिब्रेशन केले. यावरुन असे दिसले की, अय्यर शाहरुख खानची थट्टा करत असावा. दरम्यान पंजाब संघातील क्रिकेटपटू शाहरुख आणि बॉलिवूड अभिनेता यांची नावं सारखीच असल्याने अनेकदा त्यांची चर्चा होत असते.

https://twitter.com/addicric/status/1509912922847432716?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1509912922847432716%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Fiyer-do-on-shahrukh-khan-wkt%2F

 

या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम गोलंदाजी करताना कोलकाता संघाने पंजाबला १३७ धावांवरच रोखले. उमेश यादवने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याला या सामन्यात सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.  कोलकाता संघाने हे लक्ष्य १४. ३ षटकातच गाठले आणि पंजाबला ६ विकेट्सने पराभूत केले. यावेळी आंद्रे रसल ३१ चेंडूत ७० धावा करुन नाबाद राहिला. तसेच श्रेयस अय्यरने २६ धावांची खेळी खेळली.

महत्त्वाच्या बातम्या-

IPL2022| गुजरात वि. दिल्ली सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

…म्हणून विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची ट्रॉफी परत लंडनला पाठविण्यात आली

काय सांगता! राशिद खान स्वत:ला मानत नाही लेग स्पिनर, कारणही केलंय स्पष्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---