---Advertisement---

तिसऱ्या लग्नासाठी शोएबने सानियाला दिला घटस्फोट! पण आता मुलागा इजहानचा कोण करणार सांभाळ?

Shoaib Malik & Sania Mirza with son Izhaan
---Advertisement---

पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारताची दिग्गज टेनिसबटू सानिया मिर्झा यांच्यातील नाते संपल्यात जमा आहे. शनिवारी (20 जानेवारी) शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केले. शोएबचे हे तिसरे लग्न आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार शोएब आणि सानियामध्ये घटस्फोट झाला आहे. पण या दोघांचा मुलगा इजहान कोणासोबत राहणार, असा प्रश्न आता उपस्थिती केला जात आहे.

शोएब मलिक (Shoaib Malik) आणि सानिया मिर्झा (Sania Mirza) या दोघांनी 2010 मध्ये लग्न केले होते. त्याआधी दोघे पाच महिने एकमेकांना डेट देखील करत होते. भारत आणि पाकिस्तानच्या या स्ट्राक खेळाडूंमधील प्रेमप्रकरण आणि नंतर लग्न त्यावेळी चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. मागच्या मोठ्या काळापासून दोघे सोबत होते. पण अलिकडच्याच काही महिन्यांमध्ये शोएब आणि सानियामध्ये सर्वकाही ठीक नसल्याच्या बातम्या समोर येत होत्या. या दोघांकडून अद्याप याविषयी कुठलीच प्रतिक्रिया दिली गेली नाही. पण शनिवारी (20 जानेवारी) शोएबने अभिनेत्री सना जावेद (Sana Javed) हिच्याशी लग्न केल्यानंतर सर्व गोष्टींची उत्तर मिळाली.

अखेर शोएब मलिक आणि सानिया मिर्झा वेगळे झाले आहेत. पण त्यांचा मुलाग इजहान याचे पुढे काय होणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. शोएब आणि सानियाच्या जवळच्या सूत्राकडून अशी माहिती मिळाली आहे की, “शोएबीने सानियासोबत घटस्फोट घेतला आहे. हे दोघेही सहमतीने वेगळे होत आहेत. दोघांच्या घटस्फोटानंतर त्यांचा मुलगा इजहान दुबईत राहणार आहे. दोघे मिळून त्याच्या संगोपनाचा सर्व खर्च उचलतील.” दरम्यान, शोएब आणि सानिया 2018 मध्ये इजहानचे आई-वडील झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Malik (@realshoaibmalik) 

दरम्यान, शोएबने सानियासोबत लग्न करण्याआहीदी एक लग्न केले होते. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव आयशा सिद्दीकी होते. वृत्तांनुसार 2010 साली त्याने सानियासोबत लग्न करण्यासाठी आयशासोबत गटस्फोट घेतला होता. दुसरीकडे शोएबची नवीन नवरी सना जावेद हीदेखील लग्नांच्या बाबतीत मागे नाही. सनाने शोएबसोबत आपले दुसरा संसार थाटला आहे. याआधी 2020 मध्ये तिने गितकार उमर जसवाल याच्याशी लग्न केले होते. पण या दोघांमधील नाते जास्त काळ टिकू शकले नाही. शोएब मलिक आणि सना जावेद यांच्या अफेअरच्या चर्चा मागच्या काही महिन्यांपासून माध्यमांमध्ये सुरू होत्या. शनिवारी दोघांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून लग्नाची माहिती देत खास पोस्ट शेअर केली. (After the divorce of Shoaib Malik and Sania Mirza, with whom will their son Izhaan live?)

महत्वाच्या बातम्या – 
‘तो जगातील सर्वोत्तम…’, कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच इंग्लंड संघ रोहित शर्माला घाबरला
मोठी बातमी; भारताचा जावई दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर, प्रसिद्ध अभिनेत्रीशी थाटला संसार, पाहा फोटो

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---