---Advertisement---

ब्रिस्बेन कसोटी विजय टीम इंडियासाठी ठरला आणखीनच सुखद; कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत घेतली ‘या’ क्रमांकावर झेप

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 8:03 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या ब्रिस्बेन येथील कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत बॉर्डर -गावसकर मालिका 2-1 ने जिंकली आहे. भारताच्या या ऐतिहासिक मालिका विजयानंतर आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये देखील मोठे उलटफेर झाले असून, भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पछाडत प्रथम क्रमांक पटकावला आहे. आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये विजयाच्या टक्केवारीला विशेष महत्व असते. या क्रमवारीतील टॉप 2 संघ आगामी काळात कसोटी चॅम्पियनशिपसाठी अंतिम सामना खेळणार आहेत.

ब्रिस्बेन येथील विजयाने भारतीय संघ 71.7 विजयाच्या टक्केवारीसह प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंड संघ द्वितीय क्रमांकावर असून त्यांची टक्केवारी 70 इतकी आहे. भारताविरुद्धच्या पराभवाने ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या स्थानावर घसरला असून त्यांची विजयाची टक्केवारी 69.2% आहे. भारताला टॉप 2 मधील आपले स्थान पक्के करण्यासाठी इंग्लंड विरुद्ध आगामी काळात मायदेशात होणाऱ्या 4 सामन्याच्या मालिकेत 2 विजय आवश्यक आहेत.

ब्रिस्बेन कसोटी विजय –

ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाने उत्तम कामगिरी करत मालिका विजय मिळवला.या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मार्नस लॅब्युशेनच्या शतकी खेळीच्या जोरावर 369 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावात भारताकडून टी नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने शार्दुल ठाकून (67) आणि वॉशिंग्टन सुंदर (62) यांच्या शतकी भागीदारीसह पहिल्या डावात 336 धावा केल्या.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 294 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद सिराजने या डावात सर्वाधिक 5 विकेट्स आणि शार्दुल ठाकूरने 4 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या डावातील 33 धावांच्या आघाडीसह 328 धावांचे आव्हान दिले होते. भारताने 7 विकेट्स गमावत 97 षटकात या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत सामना जिंकला.

दुसऱ्या डावात भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक ९१ धावांची खेळी केली. तसेच रिषभ पंतने ८९ धावांची नाबाद खेळी केली. त्याला वॉशिंग्टन सुंदरने २२ धावा करत चांगली साथ दिली. तर चेतेश्वर पुजाराने भक्कम बचावात्मक खेळी करताना ५६ धावा केल्या. त्यामुळे भारताला हे आव्हान पार करता आले आहे.

ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन लायनने २ विकेट्स आणि जोश हेजलवूडने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या – 

Video : टीम इंडियाची खिलाडूवृत्ती! ‘या’ कारणामुळे रहाणेने नॅथन लायनचा जर्सी देऊन केला खास सन्मान

ब्रेकिंग! इंग्लंड विरुद्ध चेन्नईत होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा; विराटसह ‘या’ खेळाडूंचे पुनरागमन

.. अन्‌ क्रिकेटवर मनापासून प्रेम करणाऱ्या शरद पवार यांनी भारतीय संघाला दिल्या आभाळर शुभेच्छा, पहा ट्विट 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---