पाकिस्तान संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध हार पत्करावी लागली आहे. मिचेल सॅटनर याच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या न्यूझीलंड संघाने पाकिस्तान विरुद्ध 60 धावांनी विजय मिळवला आहे. पुढच्या सामन्यात पाकिस्तानला भारतीय खेळाडूंचा सामना करायचा आहे. रविवारी (22 फेब्रुवारी) रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ समोरासमोर असणार आहेत. या सामन्यावरती अनेक दिग्गज आपले मत मांडत आहेत. पाकिस्तानचे माजी क्रिकेटर बासित अली यांनी भारत विरूद्ध पाकिस्तान होणाऱ्या सामन्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे
बसित अली यांचे म्हणणे आहे की, जर पाकिस्तान संघाने भारतीय संघाला हरविले तर तो उलटफेर होईल. भारतीय संघ संतुलित आहे परंतु, जर पाकिस्तान सामन्यात यशस्वी ठरला तर हा खूप मोठा उलटफेर होईल. पाकिस्तानचा स्तर कमी होत चालला आहे. बासित अली यांनी आपल्या यू ट्यूब चॅनल वरती वक्तव्य केले आहे की, भारत – पाकिस्तान सामना हा एकतर्फी असतो, म्हणूनच आता टीव्हीची तोडफोड केली जाणार नाही, कारण पाकिस्तानमध्ये आता महागाई भरपूर वाढलेली आहे. आता बोलूनच सगळ्या गोष्टी होतील. याशिवाय बासित अली यांनी पाकिस्तानी फलंदाजी विषयीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बासित अली म्हणाले की, फखर झमान स्पर्धेतून बाहेर पडला आहे, आता पाकिस्तानचा नंबर 1 ते नंबर 5 पर्यंतचा फलंदाजीचा क्रम कमी-अधिक प्रमाणात सारखाच आहे. बासित अली यांचा असा विश्वास आहे की भारतीय फलंदाज विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध चांगली खेळी खेळेल. विराट कोहली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याची वाट का पाहत आहे हेही त्यांनी सांगितले. रविवारी भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांसमोर येतील. दोन्ही संघांमधील सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. त्याच वेळी, हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होईल.
महत्वाच्या बातम्या :
RCB vs MI; हरमनप्रीत कौरचे शानदार अर्धशतक! मुंबईचा सलग दुसरा विजय
AFG vs SA: रायन रिकेल्टनचे शानदार शतक! आफ्रिकेची विजयी सलामी
Champions Trophy; भारत-पाकिस्तान सामन्यात कोण मारणार बाजी? माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी






