क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज मध्ये आज प्रमोशन फेरीच्या शेवटच्या लढती झाल्या. अहमदनगर पेरियार पँथर्स संघाने आधीच पहिला स्थान सुनिश्चित असल्याने आज स्पर्धा होती ती दुसऱ्या स्थान पटकावण्यासाठी चुरस होती. दुसऱ्या स्थानाच्या शर्यतीत असलेल्या तिन्ही संघांनी म्हणजे कोल्हापूर, नांदेड व मुंबई शहर ने विजय मिळवला. त्यामुळे गुणतालिकेत कोल्हापूर संघ दुसऱ्यावर स्थानावर कायम राहिला.
पहिल्या सामन्यात मुंबई शहर मौर्य मेवरीक्स संघाने 45-39 अश्या फरकाने पुणे पलानी टस्कर्स संघाचा पराभव करत दुसऱ्या स्थानासाठी आपली दावेदारी कायम ठेवली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात नांदेड चांबल चॅलेंजर्स संघाने 47-27 असा एकतर्फी मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स संघाचा पराभव केला. त्यामुळे मुंबई शहर दुसऱ्या स्थानच्या शर्यतीतुन बाहेर पडला.
ठाणे हम्पी हिरोज संघाने अहमदनगर पेरियार पँथर्स संघाचा धक्कादायक पराभव करत प्रमोशन फेरीत पाचव्या स्थान पटकवला. ठाणे संघाने 31-21 असा विजय मिळवला. ठाणे संघाच्या विजयात विघ्नेश चौधरी, मंगेश सोनावणे व अहमद इनामदार यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली. शेवटच्या व निर्यायक सामन्यात कोल्हापूर ताडोबा टायगर्स संघाने 46-36 असा नाशिक द्वारका डिफेंडर्स संघावर विजय मिळवत प्रमोशन फेरीत दुसरे स्थान पटकावले. कोल्हापूर कडून निखिल बर्गे ने 19 गुण मिळवले.
उद्या होणारे प्ले-ऑफसचे सामने.
क्वालीफायर 1 – नांदेड चांबल चॅलेंजर्स (P3) विरुद्ध ठाणे हम्पी हिरोज (P5)
क्वालीफायर 2 – मुंबई शहर मौर्य मेवरीक्स (P4) विरुद्ध मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स (P6)
एलिमीनेटर – 1 – पुणे पलानी टस्कर्स (P7) विरुद्ध
पालघर काझीरंगा रहिनोस (R2)
एलिमीनेटर – 2 – नाशिक द्वारका डिफेंडर्स (P8) विरुद्ध रायगड मराठा मार्वेल्स (R1)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर ठाणे हम्पी हिरोज संघाने रोखला अहमदनगर संघाचा विजयी रथ
नांदेड चांबल चॅलेंजर्स संघाचा चौथा विजय, दुसऱ्या स्थानाच्या शर्यतीत कायम