---Advertisement---

“खराब खेळपट्टीमुळे सामना हारलो…” अफगाणिस्तानच्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षकाची प्रतिक्रिया

On: गुरूवार, जून 27, 2024 6:08 PM
Jonathan Trott (1)
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 53वा सामना अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (AFG vs RSA) यांच्यामध्ये खेळला गेला. सेमीफायनल 1चा हा सामना ब्रायन लारा स्टेडियमवर रंगला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं बाजी मारली आणि फायनलसाठी तिकीट पक्कं केलं. परंतू अफगाणिस्ताननं हा सामना गमावल्यानंतर मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्राॅट नाराज झाले आहेत. ते म्हणाले खराब खेळपट्टीमुळे आम्ही सामना हारलो.

सामना संपल्यानंतर अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्राॅट (Jonathan Trott) म्हणाले, “‘मला स्वतःला अडचणीत आणायचं नाही आणि मला आंबट द्राक्षांसारखं बनायचं नाही, परंतू ही अशी खेळपट्टी नव्हती ज्यावर कोणीही विश्वचषक सेमीफायनल खेळण्यासाठी इच्छुक असेल. मी असं म्हणत नाही की खेळपट्टीवर चेंडूची हालचाल होऊ नये. मला सांगायचं आहे की, तुम्हाला फलंदाजांचीही काळजी असायला हवी.”

पुढे बोलताना जोनाथन ट्राॅट म्हणाले, “टी20 क्रिकेटचा चा खेळ हा आक्रमकपणे धावा आणि विकेट्स घेण्याचा असतो. हा फॉरमॅट खेळपट्टीवर टिकून राहण्यासाठी बनवला गेला नाही. आम्ही शेवटच्या सामन्यानंतर 3 वाजता हॉटेलवर पोहोचू शकलो आणि 5 तासांनंतर आम्हाला निघावं लागलं. त्यामुळे आम्हाला झोपायला जास्त वेळ मिळाला नाही आणि खेळाडू खरोखरच थकले होते. जेव्हा तुम्ही विश्वचषक किंवा कोणत्याही स्पर्धेत खेळता तेव्हा सर्वकाही तुमच्या मनाप्रमाणे घडत नाही.”

यंदाच्या टी20 विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान संघानं चमकदार कामगिरी केली होती. त्यांनी या स्पर्धेत 8 सामन्यांपैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला. तर 3 सामन्यांध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियासारख्या चॅम्पियन संघाचा पराभव करुन इतिहास रचला. तर अफगाणिस्तान टी20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. परंतू त्यांना निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ‘या’ भारतीय खेळाडूला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी…!
बीसीसीआयचा मोठा निर्णय! तुषार-मयंकसह हे 7 वेगवान गोलंदाज झाले मालामाल
विराट-रोहितबद्दल कपिल देवनं केलेल्या वक्तव्यानं उडाली खळबळ!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---