भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग मागील एक वर्षापासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे. त्यामुळे त्याच्या भारतीय संघातील पुनरागमनाबाबत अनेकदा चर्चा होत आहेत. त्यानेही तो 2019 च्या विश्वचषकापर्यंत खेळणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.
परंतू आता त्याचे भारतीय संघातील पुनरागमन कठीण असल्याचे दिसून येत आहे. कारण मंगळवार पासून सुरु झालेल्या देवधर ट्रॉफीस्पर्धेसाठी युवराजची भारताच्या अ, ब आणि क यातील कोणत्याही संघात निवड झालेली नाही.
तसेच देवधर ट्रॉफीसाठी पृथ्वी शॉ, कृणाल पंड्या,नितिश राणा, शुभमन गिल अशा अनेक युवा खेळाडूंची तसेच सुरेश रैना, आर अश्विन, धवल कुलकर्णी, अजिंक्य रहाणे अशा भारतीय संघातील खेळाडूंची निवड झाली आहे.
त्याचबरोबर आयसीसीने 2019 च्या विश्वचषकात सामिल होणाऱ्या संघाच्या बोर्डांना संभावित 30 खेळांडूंची नावे देण्यास सांगितले आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमधून अनेक युवा खेळाडू निवड समितीला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यामुळे जर युवराज देशांतर्गत क्रिकेट खेळला नाही तर त्याची 2019 च्या विश्वचषकासाठी भारतीय संघातील निवड जवळ जवळ अशक्य वाटत आहे.
युवराजची देशांतर्गत क्रिकेटमधील मागील काही सामन्यांमध्ये कामगिरीही खास झालेली नाही. त्याने मागील 5 सामन्यात मिळून 175 धावा आणि 2 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच युवराज भारताकडून शेवटचे जून 2017 मध्ये विंडीज विरुद्ध खेळला आहे.
युवराज हा 2007 च्या टी20 आणि 2011 च्या वनडे विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. त्याने या दोन्ही स्पर्धत महत्त्वाची कामगिरी पार पाडली होती. तसेच 2011 च्या विश्वचषकात त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट कोहली सचिनप्रमाणेच ४० वर्षांपर्यंत खेळणार, जाणुन घ्या काय आहे कारण?
–८० वर्षांचा धोनी व्हिलचेअरवर असेल तरी त्याला माझ्या संघात खेळव
–गांगुली फॅन्सचे टेन्शन वाढले, विराटकडून हा विक्रम किरकोळीत मोडला जाणार