---Advertisement---

Video | वनडे मालिकेचा चषक उंचावताना कर्णधार रोहितने केलेली कृती पाहून करोडो क्रिकेटप्रेमी भारावले

On: शुक्रवार, फेब्रुवारी 11, 2022 10:59 PM
Team India Won Odi Series
---Advertisement---

कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) म्हणजे सध्या… ‘तो आला, त्याने पाहिलं आणि त्यांने जिंकलं’ असंच काहीसे होताना दिसत आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिका विजयानंतर तर कर्णधार रोहितने विक्रमांची जणू रासच पाडलीये. मालिका जिंकणारा कर्णधार, व्हाईट वॉश देणारा कर्णधार ते सलग विजय घेणारा कर्णधार असे एक ना अनेक विक्रम रोहितने केलेत.

रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाची होणारी घोडदौड ही सर्वांनाच सुखावणारी आहे. यात फक्त संघाचा विजय हीच गोष्ट कारणीभूत नसून, रोहित शर्माची नेतृत्व करण्याची शैली, संघ सहकाऱ्यांप्रती त्याची वागणूक-भावना आणि सर्वांना सामावून व समजावून घेण्याचे कौशल्य, यामुळे रोहित सध्या सर्वांनाच भावताना दिसत आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध मालिका (ODI Series Against West Indies) जिंकल्यानंतर तर रोहित शर्माने एका कृतीने कोट्यवधी क्रिकेट रसिकांना भारावून टाकले आहे. (India Winning ODI Series Against West Indies)

मालिकेचा चषक आणि रोहित शर्माची ती कृती….

टीम इंडियाने ३-० अशा फरकाने वेस्ट इंडिजला पराभूत करत वनडे मालिका खिशात टाकली. यानंतर अहमदाबादेतील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघाने एकच जल्लोष केला.

सामन्यातील खास कामगिरीसाठी श्रेयस अय्यर याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. तर संपूर्ण मालिकेत चमकदार कामगिरी करणारा युवा आणि प्रतिभावान क्रिकेटपटू प्रसिद्ध कृष्णा मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आपले मनोगत व्यक्त केले ज्यात त्याने संघातील सर्व खेळाडूंप्रती आदरभाव आणि समाधाव व्यक्त केले. त्यानंतर रोहितला विजयी चषक सोपवण्यात आला.

रोहितने चषक आपल्या हाती घेतला आणि संपूर्ण संघातील खेळाडू जिथे उभे थांबले होते, तिथे तो गेला. त्यानंतर रोहितने टीम इंडिया संघातील युवा खेळाडू ‘रवी बिश्नोई’ (Ravi Bishnoi) याच्या हाती विजयी चषक सोपावला. त्यावेळी तिथे असलेल्या आणि टीव्हीवर तो क्षण पाहणाऱ्या कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना रोहितबद्दल आदरभाव वाटला. स्वतः रवी बिश्नोई देखील चषक हातात घेताना भारावल्याचे दिसून आले. त्या एका कृतीने रोहित शर्माने आपले व्यक्तीमत्व काय आहे, ते संपूर्ण जगाला दाखवून दिले. (After Winning ODI Series Against West Indies Captain Rohit Sharma Handed Over Trophy To Ravi Bishnoi)

अधिक वाचा

टीम इंडियाचा मालिका विजय; कर्णधार रोहितचा भीम पराक्रम, किंग कोहलीलाही टाकलंय मागे

IND v WI | टीम इंडियाचा ३-० फरकाने मालिका विजय, अंतिम वनडेत वेस्ट इंडिजचा दारुण पराभव

“५०-६० कसोटी खेळल्यानंतरच रिषभची दिग्गजांशी तुलना होईल’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---