---Advertisement---

‘मी लहानपणापासून विराटला खेळताना पाहतेय…’, कोहलीबाबतच्या ‘त्या’ प्रश्नावर श्रेयंका पाटीलचे लक्षवेधी उत्तर

Sheyanka-Patil-And-Virat-Kohli
---Advertisement---

बुधवारी (दि. 21 जून) भारतीय संघाने महिला इमर्जिंग आशिया चषक 2023चा किता आपल्या नावावर केला. भारतीय संघाला विजयी बनवण्यात श्रेयंका पाटील हिने सिंहाचा वाटा उचलला. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी श्रेयंकाला प्लेयर ऑफ द सीरिज किताबाने गौरवण्यात आले. 20 वर्षीय अष्टपैलू श्रेयंका पाटील भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज विराट कोहली याला आपला आदर्श मानते. विशेष म्हणजे, ज्याप्रकारे विराट मैदानावर आक्रमकता दाखवतो, तशाच आक्रमकतेने श्रेयंकालाही मैदानावर खेळायला आवडते. महिला इमर्जिंग आशिया चषकाचा किताब जिंकंल्यानंतर तिने म्हटले की, ती विराटला लहानपणापासून खेळताना पाहून मोठी झाली आहे.

काय म्हणाली श्रेयंका पाटील?
अंतिम सामन्यात बांगलादेशला धूळ चारल्यानंतर श्रेयंका पाटील विराट कोहली (Shreyanka Patil Virat Kohli) याच्यासारखी आक्रमकता दाखवताना दिसली. या आक्रमकतेविषयी विचारले असता, श्रेयंका म्हणाली की, “होय, बालपणापासून आम्ही विराट कोहलीला खेळताना पाहत आलो आहोत आणि हे नैसर्गिकरीत्या घडते. तसेच, मला दबावात खेळायला आवडते.”

सामन्याचा आढावा
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने वृंदा दिनेश (36) आणि कनिका आहुजा (नाबाद 30) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 127 धावा चोपल्या होत्या. यावेळी बांगलादेशकडून गोलंदाजी करताना नाहिदा अख्तर आणि सुल्ताना खातून यांनी सर्वाधिक प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघाचा डाव 19.2 षटकात 96 धावांवर संपुष्टात आला.

https://www.instagram.com/p/Ctv974NgRyV/

बांगलादेशकडून फलंदाजी करताना नाहिदा अख्तर हिने सर्वाधिक नाबाद 17 धावा केल्या, तर शोभना मोस्तरी हिने 16 धावांचे योगदान दिले. यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना श्रेयंका पाटील (Shreyanka Patil) हिने 13 धावा खर्चून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच, मन्नत कश्यपने 20 धावा खर्चून 3 विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त फिरकीपटू कनिका आहुजा हिनेही 23 धावा खर्चून दोन विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे श्रेयंका पाटील आणि मन्नत कश्यप यांच्या फिरकीच्या जादूने भारतीय संघाने बांगलादेशला 31 धावांनी पराभूत करत महिला इमर्जिंग आशिया चषक 2023चा किताब जिंकला. (after winning player of the series shreyanka patil says this take a look)

महत्वाच्या बातम्या-
आता MPL गाजवणार महाराष्ट्राच्या पोरी! स्मृतीकडे कर्णधारपद, तर ऋतुराजची पत्नीही दाखवणार जलवा, पाहा संघ
कौतुकास्पद! एमपीएलमध्ये माजी महिला क्रिकेटपटूंचा सन्मान, दिला Womens Cricketच्या इतिहासाला उजाळा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---