नवीन वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची रविवारी (29 जानेवारी) सांगता झाली. स्पर्धेतील अखेरचा सामना पुरुष एकेरीचा पार पडला. सर्बियाच्या नोवाक जोकोविचने या अंतिम सामन्यात ग्रीसच्या स्टिफानोस त्सित्सिपास याचा 6-3, 7-4, 7-6 असा पराभव केला. जोकोविचने दहाव्यांदा या स्पर्धेचा अंतिम सामना खेळत प्रत्येक वेळी विजेतेपद मिळवण्याचा मान मिळवला आहे. तसेच हे त्याच्या कारकिर्दीतील 22 वे ग्रँडस्लॅम ठरले. याबरोबर जोकोविचनने अनेक विक्रमही केले. ते विक्रम खालीलप्रमाणे
पुरुष एकेरीची सर्वाधिक ग्रॅंडस्लॅम जिंकणारे पुरुष खेळाडू
२२- नोवाक जोकोविच (Novak Djokovic)
२२- राफेल नदाल
२०- रॉजर फेडरर
१४- पीट सॅंम्प्रास
ओपन एरामध्ये सर्वाधिक एकेरी विजेतेपद मिळवणारे महिला व पुरुष खेळाडू
२३- सेरेना विलियम्स
२२- स्टेफी ग्राफ
२२- नोवाक जोकोविच
२२- राफेल नदाल
२०- रॉजर फेडरर
१८- ख्रिस इवर्ट
१८- मार्टिना नवरातिलोवा
१४- पीट सॅंम्प्रास
जोकोविच जगातील दुसरा असा खेळाडू बनलाय ज्याने १५ वर्षात दोन वेळा एखादी ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. त्याने २००८ साली पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती. तर त्यानंतर २०२३मध्ये पुन्हा ही स्पर्धा जिंकली. यापुर्वी स्पेनच्या राफेल नदालने २००५साली फ्रेंच ओपन जिंकली होती. त्यानंतर २०२२मध्ये फ्रेंच ओपन जिंकली.
एकच स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणारे खेळाडू
१४- राफेल नदाल, फ्रेंच ओपन
१०- नोवाक जोकोविच, ऑस्ट्रेलियन ओपन
८- रॉजर फेडरर, विंबल्डन
८- पीट सॅंम्प्रास, विंबल्डन
७- नोवाक जोकोविच, विंबल्डन
(After winning the Australian Open 2023, Novak Djokovic broke many records)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: ऑस्ट्रेलियन ओपनवर जोकोविचचेच राज्य! तब्बल दहाव्यांदा उंचावली ट्रॉफी
‘जोकर’ चमकला! ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्सित्सिपासला धूळ चारत केली नदालच्या विक्रमाची बरोबरी