आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील दुसरा आणि हंगामातील ३१ वा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात पार पडला. या सामन्यात केकेआरने आरसीबीला ९ विकेट्सने पराभूत केले. विराटचा आरसीबी संघ अवघ्या ९३ धावा करून सर्वबाद झाला आणि केकेआरने लक्ष्याचा पाठलाग करताना केवळ ६० चेंडू शिल्लक असतानाच सामन्यात विजय मिळवला. केकेआरसाठी आयपीएलमध्ये पदार्पण करणारा वेंकटेश अय्यरने या सामन्यात महत्वाची खेळी केली. तो सामना संपल्यानंतर विराट कोहलीकडून फलंदाजीसाठी काही सल्ले घेताना दिसला आहे. केकेआरने हा व्हिडिओ त्यांच्या ट्वीटरवर पोस्ट केला आहे.
अय्यरसाठी हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलाच सामना होता आणि त्याने यामध्ये संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. त्याने सामन्यात २७ चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या सात चौकार आणि एका षटकाराचाही समावेश आहे. त्याने या धावा १५० च्या स्ट्राइक रेटने चोपल्या आहेत. त्याची खेळी पाहून असे वाटलेही नाही की, हा त्याचा पदार्पण सामना आहे. तो या सामन्यात मोहम्मद सिराज, काइल जेमिसन यांच्यासारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांना चांगल्याप्रकारे सामोरे गेला.
सामन्यात केकेआर संघाने विजय मिळवल्यानंतर अय्यर आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीजवळ गेला होता. तो विराटकडे पुल शाॅटबाबत चर्चा करण्यासाठी पोहचला होता. त्याने विराटकडून या शाॅटबाबत सल्ले घेतले. विराटनेही अय्यरला पुल शाॅट खेळायला शिकवले. केकेआर संघाने त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून दोघांचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओवर काही चाहत्यांनी विराटचे कौतुक केले आहे तर काहींनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
https://twitter.com/KKRiders/status/1440007742807154698?s=20
एका चाहत्याने विराट आणि अय्यरच्या या व्हिडिओवरुन ‘रनमशीन’ला ट्रोल केले आहे. त्याने लिहिले की, ‘अय्यर केवळ २६ वर्षांचा आहे आणि विराटला फिरकी गोलंदाजीवर कसे खेळायचे? ते शिकवत आहे.’ काहींनी लिहिले की, ‘अय्यर पुढच्या सामन्यात अगदी तशाच प्रकारे अपयशी होईल, ज्याप्रकारे विराट इंग्लंडविरुद्ध झाला होता.’ यावरून असेच दिसते की, काही चाहते विराटला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत होते.
दरम्यान, विराटने आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा सुरु होण्याआधी मोठा निर्णय घेतला आहे. तो आगामी टी२० विश्वचषकानंतर भारताच्या टी२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. तसेच आयपीएलचा हा हंगाम त्याच्या आरसीबी अर्णधारपदाचा शेवटचा हंगाम असेल. तो यापूढे केवळ फलंदाजाच्या रूपात आयपीएलमध्ये खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बंगळूरूला चारीमुंड्या चीत करत कोलकाताने नोंदवला आयपीएलच्या इतिहासातील मोठा ‘सांघिक रेकाॅर्ड’