---Advertisement---

धवनचा सल्ला घेत रोहितसेनेने पंजाबला त्यांच्याच मैदानात चारली धूळ; टॉसवेळी झालेल्या चर्चेचं भांडं फुटलं

Rohit-Sharma-And-Shikhar-Dhawan
---Advertisement---

वीकेंडचा दिवस नसतानाही बुधवारी (दि. 3 मे) डबल हेडर सामने खेळण्यात आले. मात्र, यातील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आले. त्यानंतर आयपीएल 2023चा 46वा सामना पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. असे असले, तरीही कर्णधार रोहित शर्मा याच्या या निर्णयामागील कारण सध्या चर्चेचे विषय बनले आहे. काय आहे ते चला जाणून घेऊयात…

यावेळी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने आपल्या संघात एक महत्त्वाचा बदल केला. रायली मेरेडिथ याच्या जागी आकाश मधवालला संधी दिली होती. तसेच, पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाने दोन बदल केले होते. अथर्व तायडे आणि कागिसो रबाडा यांच्या जागी अनुक्रमे मॅथ्यू शॉर्ट आणि नेथन एलिस यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले होते.

रोहितने सांगितले कारण
नाणेफेकीनंतर प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर यामागील कारण रोहित शर्मा (Rohit Sharma) याला विचारले, तेव्हा त्याने स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला की, “मी शिखर धवन याला विचारले की, काय करायचे आहे. तो म्हणाला की, पहिली गोलंदाजी कर. त्यामुळे आम्ही पहिली गोलंदाजी केली. ही एक चांगली खेळपट्टी आहे. आम्ही आव्हानाचा चांगल्याप्रकारे पाठलाग केला आहे, त्यामुळे आम्ही आमच्या ताकदीवर टिकून राहिलो.”

पुढे बोलताना तो म्हणाला की, “तुम्ही नेहमीच अशा खेळपट्टीवर आव्हान आपल्या समोर ठेवू इच्छिता. संतुलन बनवणे खूपच महत्त्वाचे आहे. आम्ही खूप आयपीएल सामने खेळलो आहोत. गोष्टी लवकर बदलू शकतात. तुम्ही पाहू शकता की, गुणतालिका किती टाईट आहे. एक संघ म्हणून आम्ही काय करू शकतो, यावर लक्ष देणे महत्त्वाचे आहे. हा सामना नव्याने पुढे येण्यात आणि आपल्या योजना योग्यरीत्या वापरण्याचा प्रयत्न करण्याविषयी आहे. आमच्या संघात एक बदल आहे. मेरेडिथ दुखापतग्रस्त आहे. त्याच्या जागी आकाश मधवाल आला आहे.”

नाणेफेकीनंतर रोहित शर्मा आणि शिखर धवन (Rohit Sharma And Shikhar Dhawan) मजा-मस्ती करताना दिसले. यादरम्यान रोहितने धवनचे सिग्नेचर सेलिब्रेशनही केले. यादरम्यानचा फोटोही जोरदार व्हायरल होत आहे.

सामन्याचा आढावा
या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना लियाम लिव्हिंगस्टोन (नाबाद 82) आणि जितेश शर्मा (नाबाद 49) यांच्या खेळीच्या जोरावर 3 विकेट्स गमावत 214 धावा केल्या होत्या. यावेळी मुंबईकडून पीयुष चावलाने 2, तर अर्शद खानने 1 विकेट घेतली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने ईशान किशन (75), सूर्यकुमार यादव (66), तिलक वर्मा (नाबाद 26) आणि टीम डेविड (नाबाद 19) यांच्या जोरावर 18.5 षटकात 216 धावा केल्या. तसेच 6 विकेट्सने सामना जिंकला. यावेळी पंजाबकडून नेथन एलिसने 2, तर ऋषी धवन आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.

यासह मुंबईने हंगामातील पाचवा विजय मिळवला. मुंबईने 10 गुणांसह गुणतालिकेत सहावे स्थान मिळवले आहे. (after winning the toss mi skipper rohit sharma asked shikhar dhawan what to do)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईच्या माथ्यावर विजयी तिलक! सलग दुसऱ्या सामन्यात सहज पार केले 215 चे आव्हान, ईशान-सूर्याचा झंझावात
मोहालीत पंजाब आणि मुंबईच्या नावावर नवे विक्रम, एक संघ खुश अन् दुसऱ्यावर मान खाली घालण्याची वेळ!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---