भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार आणि फलंदाज सौरव गांगुली () एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गांगुलीच्या खांद्यावर राज्याच्या ब्रँड अँबेसिडर म्हणून जबाबदारी सोपवली आहे. गांगुलींनी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर बंगाल क्रिकेट असोसिएशन आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे.
बंगाल ग्लोबल बिजनेस समिटमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यामंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी हजर होत्या. यावेळी त्यांनी राज्याचा ब्रँड अँबेसिडर म्हणून सौरव गांगुली () यायंची नियुक्ती केली. “सौरव गांगुली एक खूप चांगले व्यक्ती आहेत. युवा पिढीसाठी ते चांगल्या पद्धतीने काम करतील. मी त्यांना बंगालचा ब्रँड अँबेसिडर म्हणून आपल्यासोबत जोडू इच्छिते,” असे मुख्यमंत्री म्हणाल्या. मंगळवारी (21 नोव्हेंबर) लाईव्ह कार्यक्रमात ही नियुक्ती केली गेली. नियुक्ती झाल्यानंतर पत्र स्वीकारण्यासाठी गांगुली मंचावर गेले. यातील एक पत्र स्वतः ममता यांनी लिहिल्याचे बोलले जात आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार ममता यांनी गांगुलींना ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी विनंती केली होती.
Sourav Ganguly, Bengal’s Son of the Soil, is now the official Brand Ambassador of West Bengal. A moment of pride bestowed by CM Mamata Banerjee, echoing the spirit of his roots. Congratulations, Dada !! pic.twitter.com/Kuz6KIewbW
— SouravGangulyCo (@SouravGangulyCo) November 21, 2023
सौरव गांगुली एक लोकप्रिय चेहरा असून बंगाल राज्याच्या ब्रँड अँबेसिडरपदी चांगले काम करण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. राज्याची एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर स्वीकारल्यानंतर गांगुलीनेही मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. गांगुली म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचे हे प्रेम सहाजिक आहे. त्यांना एकदा मेसेज केला म्हणजे त्या कितीही व्यस्त असूद्या, एका मिनिटात प्रत्युत्तर देतात.”
गांगुलीली भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वात 2003 साली भारतीय संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला होता. भारतीय संघाला आक्रमक बनवण्यात गांगुलींचे योगदान सर्वात महत्वाचे राहिले आहे. गांगुलींनी कारकिर्दीत 113 कसोटी आणि 311 वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान, 7212 कसोटी, तर 11363 वनडे धावा त्यांनी केल्या. (Sourav Ganguly Appointed as Brand Ambassador of West Bengal)
महत्वाच्या बातम्या –
संजू सॅमसन-चहलला संधी का मिळाली नाही? दिग्गज नेत्याने विचारला बीसीसीआयला प्रश्न
रोहित कर्णधार म्हणून पुढे खेळणार का? बीसीसीआयने घेतलाय मोठा निर्णय