जर एखाद्या क्रिकेटपटूकडे प्रतिभा असेल तर त्याच्या वयाकडे न पहाता त्या क्रिकेटपटूला राष्ट्रीय संघात संधी मिळायला हवी, असे परखड मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मांडले आहे.
एका कार्यक्रमात सचिन इंग्लंड संघात निवड झालेले सॅम करन आणि अोली पोप या २० वर्षीय खेळाडूंबाबत बोलताना म्हणाला.
“कोणताही क्रिकेटपटू जर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या पात्रतेचा असेल तर त्याला त्याच्या वयावरुन संघातून डावलले जाऊ शकत नाही. सॅम करन आणि ओली पोपने पूर्णपणे क्रिकेटचा आनंद लुटावा. वेळेबरोबर त्यांच्यांकडे अनुभवातून परिपक्वता येईल.” असे सचिन म्हणाला.
पुढे भारतासाठी १६ व्या वर्षीच आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सचिनने त्याच्या पदार्पणाच्या आठवणींना उजाळा दिला.
“मी ज्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा मी १६ वर्षाचा होतो. मला माझ्या पहिल्याच सामन्यात इम्रान खान, वसिम आक्रम आणि वकार यूनुस यांच्यासारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना करावा लागला होता. त्यावेळी मी त्यांचा जिद्दीने सामना केला होता.” असे सचिन या कार्यक्रमात म्हणाला.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-माजी कर्णधार म्हणतो, हे केल्याशिवाय चहलला कसोटी संघात स्थान नाही
-हे दोन सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंमधील युद्ध आहे