---Advertisement---

आयपीएलआधी धोनीने जर्सी क्रमांक 7 सोडला! सर जडेजाशी आहे कनेक्शन? वाचा सविस्तर

On: बुधवार, मार्च 18, 2026 11:25 AM
MS Dhoni Ambati Rayudu Ravindra Jadeja
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६च्या हंगामाआधी चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एमएस धोनीने आपला जर्सी क्रमांक बदलला असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात याची चर्चा सुरू झाली आहे. क्रमांक ७ साठी ओळखला जाणारा धोनी आता नव्या क्रमांकाची जर्सी घालू शकतो, मात्र ही जर्सी पिवळ्या रंगाची नाही.

धोनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये लिहिले, “काही अंक आपल्यासोबत राहतात… मात्र आज मी ८ व्या अंकाकडे वळत आहे, तुम्हाला लवकरच कळेल का?”

धोनीने च्या या पोस्टमध्ये चाहते आणि तज्ज्ञांमध्ये तर्कवितर्क सुरू झाले आहेत. सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, हा केवळ प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे की त्यामागे काही भावनिक किंवा धोरणात्मक कारण आहे. काहींनी त्यांचे अंदाज सांगायला सुरूवात केली असून, कदाचित हा बदल जर्सी क्रमांकाच्या व्यवस्थापनाशी संबंधित असू शकतो.

एका अंदाज असा वर्तविण्यात आला आहे, याचा संबंध रविंद्र जडेजाशी असू शकतो. तो आधी ८ क्रमांकाची जर्सी वापरत होता. २०२६ च्या हंगामात तो राजस्थान रॉयल्सकडून खेळत असल्याने ८ क्रमांक रिक्त झाला आहे. त्यामुळे कदाचित धोनीने हा क्रमांक घेतला असेल. ( धोनीची पोस्ट पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा)

https://www.facebook.com/reel/1479168770542188

काही क्रिकेट विश्लेषकांनी ब्रॅंडिंग आणि मार्केटिंगची चाल असल्याचे म्हटले आहे. आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेत जर्सी बदलणे हा चाहत्यांची आवड वाढवण्याचा आणि मर्चंडाईजच्या विक्रीसाठी केला गेलेला एक हेतू असू शकतो.

सध्या तरी धोनीच्या जर्सी बदलण्याचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. याबाबत धोनी किंवा फ्रॅंचायजीकडून कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. मात्र हा विषय धोनीचा असून यामागे नक्कीच काहीतरी मोठे आणि महत्वाचे कारण असेल, ते लवकरच सर्वांना कळेल.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०२३ मध्येच धोनीचा जर्सी क्रमांक ७ निवृत्त केला आहे. तसेच २०१७ मध्ये दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा जर्सी क्रमांक १० देखील कायमस्वरुपी निवृत्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---