भारत आणि पाकिस्तान संघ आशिया चषक 2022मध्ये एकमेंकासमोर दोन वेळा आले. हे दोन्ही संघ आशिया आणि आयसीसीच्या स्पर्धांमध्येच समोरासमोर येतात. तसेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS) हा सामना असताना पाकिस्तान कुठे मध्ये आला याचा विचार करत असालच, तर मंगळवारी (20 सप्टेंबर) पाकिस्तानचा सामना इंग्लंडशी आहे. तर भारत-पाकिस्तान आता थेट टी20 विश्वचषकामध्ये एकमेंकाविरोधात खेळणार आहेत.
ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषक खेळला जाणार आहे. यासाठी भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे चारही संघ चांगली कसून तयारी करत आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली येथे खेळला जाणार आहे, तर पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामना कराचीमध्ये खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना भारताच्या वेळेनुसार सायंकाळी 7.00 वाजता तर पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे.
Preps ✅#TeamIndia set for the 1⃣st #INDvAUS T20I! ???? ???? pic.twitter.com/R07qPSsNlO
— BCCI (@BCCI) September 20, 2022
इंग्लंड पुरूष क्रिकेट संघ तब्बल 17 वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. ते या दौऱ्यात सात सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहेत. यातील पहिले चार सामने कराची आणि उर्वरीत तीन सामने लाहोर येथे खेळले जाणार आहेत. इंग्लंडचा संघ मागील वर्षीच पाकिस्तानमध्ये येणार होता, मात्र त्यांनी सुरक्षेच्या कारणामुळे तो दौरा रद्द केला. या मालिकेत इंग्लंडचा संघ जोस बटलर याच्या नेतृत्वाखाली खेळणार होता, मात्र तो दुखापतीमुळे या मालिकेतील काही सामन्यांना मुकणार आहे. यामुळे इंग्लंड मोईन अली याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.
Back in action in Pakistan for the first time in 17 years! ????
???? @TheRealPCB
???? Karachi
⏰ 3.30pm (UK)
???? @SkyCricket
???? https://t.co/sttOMlchdf???????? #PAKvENG ???????????????????????????? pic.twitter.com/SAQWIm3MiV
— England Cricket (@englandcricket) September 20, 2022
ऑस्ट्रेलियाच संघ ऍरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली भारताच्या दौऱ्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारताचे जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीनंतर संघात परतले आहेत. तसेच भारत-ऑस्ट्रेलिया टी20मध्ये 23 वेळा समोरा-समोर आले आहेत. यातील 13 सामने भारताने तर 9 सामनेऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. तसेच एका सामन्याचा निकालच लागला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvsAUS | ‘हा’ फलंदाज ऑस्ट्रेलियासाठी ठरेल ‘एक्स-फॅक्टर’, माहेला जयवर्धनेची मोठी प्रतिक्रिया
INDvAUS: पहिल्याच टी20 सामन्यात लागणार रेकॉर्ड्सची रांग! विराटकडे कॅप्टन रोहितला मागे टाकण्याची संधी
विराट यादीत पहिला क्रमांक गाठणार? सचिनच्या 100 शतकांविषयी रिकी पॉंटिंगचे मोठे वक्तव्य






