---Advertisement---

VIDEO: शमीला पाहून चाहत्यांनी दिला ‘जय श्रीराम’चा नारा! पाहा पुढे काय घडले

On: रविवार, मार्च 12, 2023 4:15 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान अहमदाबाद येथे बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील अखेरचा कसोटी सामना खेळला जात आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. चौथ्या दिवशी हा सामना रोमांचक वळणावर असताना, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या दोन दिवसावर ऑस्ट्रेलियन संघाने वर्चस्व गाजवले होते. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघाचे सर्व खेळाडू ड्रेसिंग रूमकडे परतत असताना एक घटना घडली. चाहत्यांच्या एका समूहाने भारतीय संघाला पाहून जय श्रीराम असे नारे द्यायला सुरुवात केली.  काहींनी त्यावेळी तिथे उपस्थित असलेला भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचे नाव घेत शमी जय श्रीराम असे म्हटले. शमीने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले व सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये परतले. मात्र, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. काहींनी या प्रकारावर संताप व्यक्त केला असून, खेळाडूंना अशा प्रकारे धार्मिक गोष्टीवरून उकसवणे चुकीचे असल्याचे म्हटले.

यापूर्वी देखील शमीला अशा धार्मिक गोष्टींवरून लक्ष केल्याचे प्रकार घडले आहेत. 2021 टी20 पाकिस्तानविरुद्ध खराब गोलंदाजी झाल्यानंतर त्याच्या धर्मावरून टीका केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज व उमरान मलिक यांनी टीका न लावल्याने काहींनी त्यांना लक्ष केलेले.

या प्रकाराची आता सोशल मीडियावर चर्चा होत असून, काही राजकीय पक्षांनी या संपूर्ण प्रकरणावर आक्षेप नोंदवत त्या प्रेक्षकांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली.

(Ahmedabad Test Crowd Chants Jai Shri Ram After Saw Mohammad Shami After Day 2)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या 50 शतकांपेक्षा शेवटच्या 25 शतकांसाठी निघाला विराटचा घाम, आकडेवारीतून दिसतात परिश्रम
ना आक्रमकपणा, ना कुठला धांगडधिंगा! विराटने कसोटीतील 28वे शतक ठोकल्यानंतर खास अंदाजात केले सेलिब्रेशन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---