---Advertisement---

चौथा दिवस विराटचाच! कोहलीच्या दर्जा शतकाने वाढली टीम इंडियाच्या विजयाची संधी, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

---Advertisement---

बॉर्डर गावसकर कसोटी मालिका 2023चा शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. फलंदाजांना पोषक असलेल्या या खेळपट्टीवर चौथा दिवस भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने आपल्या नावे केला. तीन वर्षांपेक्षा अधिक चार कालावधीनंतर त्याने कसोटी शतक पूर्ण केले. त्याच्या 186 धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाने पहिल्या डावात 91 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावात बिनबाद 3 धावा केल्या.

 

भारतीय संघाने चौथ्या दिवसाची सुरुवात 3 बाद 259 पासून पुढे केली. अर्धशतक करून नाबाद असलेल्या विराटने अजिबात जोखीम न घेता एकेरी दुहेरी धावांवर भर दिला. दुसरीकडे जडेजाने 28 धावांवर आपला बळी गमावला. भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर याच्या पाठीचे दुखणे वाढल्याने तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. यष्टीरक्षक भरतने त्यानंतर विराटला साथ देत काही आक्रमक फटके खेळले. मात्र, दुसऱ्या सूत्राचा खेळ सुरू झाल्यानंतर 44 धावांवर त्याने आपला बळी गमावला.

त्यानंतर या मालिकेत शानदार फॉर्ममध्ये असलेल्या अक्षर पटेल याने विराटला साथ दिली. दरम्यान विराटने आपले 28 वे कसोटी शतक पूर्ण केले. अक्षरनेही आपला फॉर्म कायम राखताना अर्धशतक झळकावले. दोघांनी सहाव्या गड्यासाठी 162 धावांची मोठी भागीदारी केली. अक्षरने 79 धावा काढल्या. त्यानंतर आलेले अश्विन व उमेश हे झटपट बाद झाल्याने विराटवर दबाव वाढला. आपले द्विशतक पूर्ण करण्याच्या प्रयत्नात त्याने 186 धावांवर आपला बळी गमावला. अय्यर फलंदाजीला न आल्याने भारतीय संघाचा डाव 9 बाद 571 वर थांबला. ऑस्ट्रेलियासाठी लायनने सर्वाधिक तीन बळी टिपले.

दिवसातील अखेरचे पाच षटके खेळण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने एकही बळी न गमावता केवळ तीन धावा केल्या.

Ahmedabad Test Day 4 Virat Kohli Awaiting 28 Test Century Helps India For Take 91 Runs Lead

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या 50 शतकांपेक्षा शेवटच्या 25 शतकांसाठी निघाला विराटचा घाम, आकडेवारीतून दिसतात परिश्रम
ना आक्रमकपणा, ना कुठला धांगडधिंगा! विराटने कसोटीतील 28वे शतक ठोकल्यानंतर खास अंदाजात केले सेलिब्रेशन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---