मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स विरुद्ध अहमदनगर पेरियार पँथर्स या दोन बलाढ्य संघात आज लढत झाली. ‘अ’ गटात या दोन संघात झालेली लढत बरोबरीत सुटली होती. प्रमोशन फेरीत अहमदनगर पहिल्या तर मुंबई उपनगर संघ चौथ्या स्थानी होता. दोन्ही संघांनी अतिशय सावध सुरुवात केली. पहिल्या पाच मिनिटांच्या खेळानंतर 3-3 असा बरोबरीत सामना सुरू होता.
मध्यांतरा पूर्वी अहमदनगर संघाने उपनगर संघाला ऑल आऊट करत 16-11 अशी आघाडी मिळवली. प्रफुल झवारेच्या आक्रमक खेळीने अहमदनगर संघाला 5 गुणांची आघाडी मिळाली. अहमदनगरच्या बचावफळी ने मुंबई उपनगरच्या आकाश रुडेलेला चढाईत गुण दिले नाहीत. मुंबई उपनगर कडून भारत खारगुटकर व रजत सिंग चढाईत गुण मिळवत होते. रुतिक कांबळी ने केलेल्या उत्कृष्ट पकडीनी सामन्यात रंगत आणली.
मुंबई उपनगरच्या भारत खारगुटकर ने चांगला प्रतिकार दिला मात्र त्यांचा प्रयत्न अपुरे पडले. अहमदनगर संघाने 35-27 असा विजय मिळवत प्रमोशन फेरीत पाचवा विजय संपादन केला. या विजयाने अहमदनगर संघाने पहिल्या व दुसऱ्या स्थानासाठी आपले दावेदार आणखी मजबूत केली. अहमदनगर कडून प्रफुल झवारे ने 13 गुण मिळवले. तर पकडीत अजित पवार ने 4 तर संभाजी वाबले ने 3 गुण मिळवले. मुंबई उपनगर कडून भारत खारगुटकर ने 13 गुण मिळवत चांगली खेळी केली. (Ahmednagar Periyar Panthers team has a strong claim to be in the top two)
बेस्ट रेडर- भारत खारगुटकर, मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स
बेस्ट डिफेंडर- रुतिक कांबळी, मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स
कबड्डी का कमाल- प्रफुल झवारे, अहमदनगर पेरियार पँथर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
SRHvDC| नाणेफेक जिंकत दिल्लीची प्रथम फलंदाजी, वॉर्नर 4 वर्षानंतर खेळणार हैदराबादमध्ये
वनडे विश्वचषकात रहाणेला संधी मिळणार? चौथ्या क्रमांकासाठी ठोकली दावेदारी