---Advertisement---

बलाढ्य अहमदनगर संघ युवा कबड्डी सिरीजच्या सेमी फायनल मध्ये दाखल

On: शुक्रवार, एप्रिल 5, 2024 2:37 PM
---Advertisement---

पुणे – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आज प्ले-ऑफसच्या दुसऱ्या दिवशी क्वालिफायर 3 सामना अहमदनगर विरुद्ध नंदुरबार यांच्यात झाला. अहमदनगरच्या आदित्य शिंदे ने पहिल्याच चढाईत बोनस गुण मिळवत संघाचा खात उघडला. तर आदित्य शिंदेच्या दुसऱ्या चढाईत वरून खंडले त्याला डॅश करत बाद केले. तर प्रफुल झवारे ची सागर गावडे ने पकड करत अहमदनगर संघाला जोरदार धक्का दिला. नंदुरबार कडून तेजस राऊत व जयेश महाजन ने गुण मिळवले. तर त्यानंतर आदित्य शिंदे व प्रफुल झवारे ने गुण मिळवत सामना 6-6 असा बरोबरीत आणला होता.

अहमदनगर संघाच्या आदित्य शिंदे, शिवम पठारे व प्रफुल झवारे यांनी जोरदार खेळ करत नंदुरबार संघाला ऑल आऊट करत 11-06 अशी निर्यायक आघाडी मिळवली. त्यानंतर ही प्रफुल व आदित्य यांनी चढाईत गुण मिळवत संघाची आघाडी वाढवत मध्यंतरा पूर्वी नंदुरबार संघाला ऑल आऊट करत मध्यंतराला 25-10 अशी आघाडी मिळवली होती. मध्यंतरा नंतरही अहमदनगर संघाने आपला आक्रमक खेळ सुरु ठेवला. बचावफळीत संकेत खलाटे व सोमनाथ बोडगे यांनी उत्कृष्ट पकडी केल्या. नंदुरबार संघ तिसऱ्यांदाऑल आऊट झाल्यानंतर नंदुरबार ने जिंकण्याच्या आशा सोडल्या व आपल्या सर्व राखीव खेळाडूंना मैदानावर उतरवले.

अहमदनगर संघाने नंदुरबार संघाला संपूर्ण सामन्यात 6 वेळा ऑल आऊट करत सामना 63-15 असा जिंकला. विजयासह अहमदनगर संघाने सेमी फायनल मध्ये प्रवेश निश्चित केला. अहमदनगर संघाकडून प्रफुल झवारे ने सर्वाधिक 16 गुण मिळवले. तर आदित्य शिंदे ने चढाईत 12 गुण मिळवले. संकेत खलाटे ने बचवाफळी उत्कृष्ट खेळ करत 7 गुण मिळवले. तर सौरव मेद ने पकडीत 4 तर सोमनाथ बोडके ने पकडीत 3 गुण मिळवत महत्वपूर्ण भूमिका निभावली. नंदुरबार संघ उद्या सेमी फायनल क्वालिफायर सामना खेळेल.

बेस्ट रेडर- प्रफुल झवारे, अहमदनगर
बेस्ट डिफेंडर- संकेत खलाटे, अहमदनगर
कबड्डी का कमाल – प्रफुल झवारे, अहमदनगर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---