पुणे (24 मार्च 2024) – आजचा दुसरा सामना अहमदनगर विरुद्ध पालघर यांच्यात झाला. अहमदनगर संघाने 5 पैकी 5 सामने जिंकत प्रमोशन फेरीत पहिला स्थानावर होता तर पालघर संघ 5 पैकी 3 विजयासह तिसऱ्या स्थानावर होता. अहमदनगर संघाने आक्रमक पवित्रा घेत सामन्यावर आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली होती. प्रफुल झावरे व आशिष यादव यांच्या चपळ खेळीने पालघर संघाला ऑल आऊट करत आघाडी मिळवली. त्याना बचावपटूंनी चांगली साथ दिली.
अहमदनगर संघाने आपला आक्रमक खेळ कायम ठेवत मध्यंतरापूर्वी पुन्हा एकदा पालघर संघाला ऑल आऊट केले. मध्यंतराला पालघर संघाने 24-07 अशी निर्यायक आघाडी घेतली होती. मध्यंतरा नंतर ही आपला आक्रमक खेळ कायम ठेवत आघाडी वाढवत सामन्यावर पकड मजबूत केली. उत्तराधार्थ अहमदनगर संघाने पुन्हा दोन वेळा ऑल आऊट करत अक्षरशः हतबल केले होते. पालघरच्या बचावपटूंनी खूप चुका करत अहमदनगरच्या चढाईपटूंना गुण दिले.
अहमदनगर संघाने 50-21 असा एकतर्फी विजय मिळवत प्रमोशन फेरीतील सलग सहावा विजय संपादन केला. अहमदनगरच्या या विजयात आशिष यादव व प्रफुल झावरे हे विजयाचे शिल्पकार ठरले. आशिष यादव व प्रफुल झावरे यांनी चढाईत प्रत्येकी एकूण 14 गुण मिळवले. सोमनाथ बेडगे यांनी हाय फाय पूर्ण करत पकडीत एकूण 5 गुण मिळवले. अभिषेक मापारी व संकेत खलाटे यांनी पकडीत प्रत्येकी 3 गुण मिळवत महत्वपूर्ण भूमिका निभावली. तर पालघर कडून हर्ष मेहेरव प्रेम मंडळ यांनी अष्टपैलू खेळ करत गुण मिळवले.
बेस्ट रेडर- प्रफुल झावरे, अहमदनगर
बेस्ट डिफेंडर- सोमनाथ बेडगे, अहमदनगर
कबड्डी का कमाल – प्रफुल झावरे, अहमदनगर
महत्वाच्या बातम्या –