---Advertisement---

एडन मार्करमचा लिलावातही पराक्रम! हैद्राबादने विश्वास दाखवत लगावली भली मोठी बोली

On: रविवार, फेब्रुवारी 13, 2022 12:36 PM
aiden-markram
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहायला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ॲडेन मार्करमचा (aiden markram) देखील समावेश होता.

गतवर्षी झालेल्या आयपीएल २०२१ स्पर्धेत ॲडेन मार्करमला पंजाब किंग्ज संघात स्थान देण्यात आले होते. इंग्लंडचा फलंदाज डेविड मलान स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर, त्याच्या ऐवजी ॲडेन मार्करमला संधी देण्यात आली होती. या संघातून त्याला केवळ ६ सामने खेळण्याची संधी मिळाली होती. ज्यामध्ये त्याने १४६ धावा केल्या होत्या. परंतु हंगामासाठी पंजाब किंग्ज संघाने त्याला रिलीज केले होते.

दक्षिण आफ्रिकेचा हा स्टार खेळाडू आता आगामी हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येणार आहे. सनरायझर्स हैदराबादने त्याला २.६ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. त्याची मूळ किंमत ही १ कोटी रुपये होती. आता आगामी हंगामात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

महत्वाच्या बातम्या :

IPL Auction: पहिल्या दिवशी ‘या’ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, तर अशी आहे संघांची स्थिती

पंजाब संघात दाखल झालेल्या शिखर धवनची आली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘ट्रॉफी नक्कीच…’

आयपीएल ऑक्शन दोन परिवारांसाठी ठरला खास!! एकाच दिवशी केली तब्बल ४२.५ कोटींची कमाई

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---