---Advertisement---

एयर इंडियाने मागितली भारतीय टेबल टेनिस खेळाडूंची माफी

On: सोमवार, जुलै 23, 2018 6:47 PM
---Advertisement---

भारतीय टेबल टेनिस खेळाडू आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेती मनिका बत्रा आणि टेबल टेनिसच्या अन्य खेळाडूंची एयर इंडियाने माफी मागितली आहे.

एयर इंडियाने रविवारी (22जुलै)ला भारतीय टेबल टेनिसच्या संघाला इंदिरा गांधी विमानतळावर रोखले होते.

आजपासून (23जुलै) सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या स्पर्धेत सहभागी भारताचे 17 खेळाडू आणि महत्त्वाचे अधिकारी मेलबर्नला जाण्यासाठी निघाले होते. मात्र एयर इंडियाने त्यांना सांगितले, या 17 पैकी फक्त 10 जणच जाऊ शकतात.

एयर इंडियाच्या या ढिसाळ कारभाराबद्दल भारतीय संघाने नाराजी व्यक्त केली.

यावेळी बत्राने केलेल्या ट्विटमध्ये तिने म्हटले की, ‘उद्यापासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सहभागी होण्यास माझ्यासह शरथ कमल, मौमा दास, हरमीत, सुथिर्ता, सथयन आणि मधुरिका हे आजच्या विमानाने मेलबर्नला जाणार होतो. पण आम्हा सात जणांना विमानात बसण्याची जागा नाही असे आम्हाला एयर इंडियाने सांगितले.’

तिच्या या ट्विटची भारतीय खेळ विभागाच्या महासंचालिका नीलम कपूर यांनी लगेच दखल घेऊन खेळाडूंची जाण्याची व्यवस्था केली.

बत्राने कपूर यांनी केलेल्या व्यवस्थेचे आभार मानले. तसेच तिने तिकीटासह फोटो काढून तो ट्विटरवर शेयर केला.

https://twitter.com/manikabatra_TT/status/1021057433832251392

हा संघ मागील आठवड्यात झालेल्या कोरिया ओपनमध्ये खेळला आहे. या स्पर्धेत सथयन पहिल्या फेरीतच कोरियाच्या लीम जोंग-हून कडून पराभूत झाला.

तर मनिका बत्रा आणि मौमा दास, मधुरीका पाटकर आणि पुजा सहस्त्रबुद्धे या महिला दुहेरीतील पहिल्या फेरीत पराभूत झाले.

महत्त्वाच्या बातम्या-

सानिया मिर्झाचा मेसट ओझीलला पाठिंबा, वंशभेदाचा केला निषेध

पाकिस्तानी गोलंदाजाची चालाखी, पहा कसे केले सेलिब्रेशन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment