---Advertisement---

एयर इंडिया, देना बँक, सेंट्रल बँक, डब्लू.टी.ई., ठाणे मनपा “ठाणे महापौर चषक” कबड्डी स्पर्धेच्या बादफेरीत.

On: बुधवार, फेब्रुवारी 27, 2019 1:41 PM
---Advertisement---

दिवा गावदेवी क्रीडा महोस्तव मैदान, दिवा पूर्व येथे सुरू असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धा काल दुसऱ्या दिवशी साखळी सामने पार पडले.

महिला विभागात देना बँक, डब्लू टी ई इन्फ्रा, ठाणे मनपा, इनरॉल्ड इन्फ्रा, विजयश्री प्रोसेस, अनुष्का ट्रॅव्हल, यादव उद्योग समूह, एम एम ए स फाउंडेशन या संघांनी बादफेरीत प्रवेश निश्चित केला. तर पुरुष विभागात एयर इंडिया, युनियन बँक, देना बँक, सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल रेल्वे, चव्हाण उद्योग समहू, संघवी डेव्हलपर्स, न्यु इंडिया इन्शुरन्स, एस अकॅडमी, शारदा डेयरी, रिझर्व्ह बँक या संघानी बादफेरीत प्रवेश मिळवला. पुरुष विभागात २ तर महिला विभागात १ असे तीन महत्वपूर्ण साखळी सामने शिल्लक असून तिन्ही सामने गटातील विजयी व उपविजयी स्थानासाठी आहेत.

पुरुष विभागात झालेल्या अ गटात सामन्यात एयर इंडियाने नव्हल डॉकयार्ड मुंबईचा ३७-२४ असा पराभव करत विजय मिळवला. मध्यंतरापर्यत २०-१३ अशी आघाडी एयर इंडिया कडे होती. सुशांत साहिल व पंकज मोहितेच्या आक्रमक चढायानी एयर इंडियाने सामन्यावर पकड बनवली. पकडीमध्ये आदित्य शिंदे व संकेतने चांगला खेळ केला. एयर इंडियाचा बादफेरीतील प्रवेश निश्चित झाला असून गटातील एक सामना शिल्लक आहे. देना बँकने सेंचुरी रियान संघाचा ४८-२१ असा पराभव करत बादफेरीत प्रवेश मिळवला.

सेंट्रल रेल्वे संघाने ठाणे पोलीस संघाचा ३४-२४ असा पराभव केला. संदीप पाटीलने चांगला खेळ केला. सेंट्रल रेल्वेने गटातील शेवटच्या सामन्यात रिझर्व्ह बँकेचा ३७-२७ असा पराभव करत बादफेरीत प्रवेश मिळवला. युनियन बँकने ४१-१० असा बृहन्मुंबई महानगरपालिकेवर विजय मिळवला. तर संघवी डेव्हलपर्स, बारामती संघाने बृहन्मुंबई महानगरपालिका संघाचा ४३-१४ असा पराभव केला. दोन पराभव मुळे मुंबई मनपाचे आव्हान संपुष्टात आले. ब गटातील युनियन बँक विरुद्ध संघवी डेव्हलपर्स हा महत्वपूर्ण सामना बाकी आहे.

महिला विभागात डब्लू टी ई इन्फाने अनुष्का ट्रॅव्हल संघचा ४५-२० असा पराभव केला. सायली केरीपले, स्नेहल शिंदे व सायली जाधव यांनी चांगला खेळ करत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. इनरॉल्ड इन्फ्राने इनफिल्ड टाऊन संघाचा ५६-१९ असा धुव्वा उडवला. तर ठाणे महानगरपालिका संघाने लक्ष्मी इंडस्ट्री संघाचा ७२-११ असा धुव्वा उडवला. यास्पर्धेतील सर्वात मोठ्या फरकाने विजत मिळवत गटातील तिन्ही सामने जिंकले.

विजयश्री प्रोसेस विरुद्ध साई सिक्युरिटी उपनगर यांच्यात चुरशीची लढत झाली. विजयश्री प्रोसेस,पुणे संघाने २७-२४ असा विजय मिळवला. देना बँक कडून साई सिक्युरिटी उपनगर संघाला ३७-२८ असे पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्याचे आव्हान गटातच संपले. विजयश्री प्रोसेस विरुद्ध देना बँक हा गटातील महत्वपूर्ण सामना शिल्लक आहे.

यादव उद्योग समूह संघाला पहिल्या दिवशी पराभवाला समोरे जावे लागले होते. दुसऱ्या दिवशी लक्ष्मी इंडस्ट्रीचा ४६-२६ असा पराभव केला तर शेवटच्या साखळी सामन्यात साई सिक्युरिटी मुंबई संघाचा ३३-२६ असा पराभव करत बादफेरी गाठली. यादव उद्योग समूहाकडून श्वेता माने व अंजली मुळे यांनी चांगला केलं केला तर साई सिक्युरिटी कडून चढाईत यशिका पूजारीने चांगला खेळ केला पण संघाला विजय मिळवून देण्यात तिला अपयश आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment