भातसई येथे गांवदेवी क्रीडा व युवक मंडळ भातसई यांचा मंडळाचा सुवर्ण महोस्तवी निमित्ताने कै. शांताराम मा. कोतवाल क्रीडा नगरीत राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेच्या अंतिम सामन्यात एयर इंडिया संघाने भारत पेट्रोलियम संघावर विजय मिळवत विजेतेपद पटाकवले.
एयर इंडिया विरुद्ध भारत पेट्रोलियम यांच्यात अंतिम सामना रंगला, सुरुवातीलाच सुशांत साहीलच्या सुपररेडने एयर इंडियाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर आकाश अडसूल ने गेलेल्या दोन सुपरटॅकल मुळे भारत पेट्रोलियम संघाचा लोन वाचवला. मध्यंतरा पर्यत १८-१३ अशी एयर इंडिया कडे आघाडी होती.
एयर इंडिया कडून चढाईत आकाश कदम व सुशांत साहिल यांनी चांगला खेळ केला. तर पकडीमध्ये शुभम शिंदेने जबरदस्त खेळ दाखवला. सलग तीन वेळा सुपरटॅकल करत शुभम शिंदेने संघावरचा लोन वाचवला, यापकडी निर्णायक ठरल्या.
एयर इंडिया संघाने ३३-२५ असा विजय मिळवत विजेतेपद पटाकवले. नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावून आलेल्या एयर इंडिया संघाने आपला दबदबा रायगड मध्ये पण कायम ठेवत ८ दिवसात दुसरे विजेतेपद पटाकवले.
स्पर्धेत बहारदार पकडी करून संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पडणाऱ्या शुभम शिंदेला उत्कृष्ट पकडपटूचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तर आकाश कदम ला उत्कृष्ट चढाईपटू आणि अजिंक्य कापरेला मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
अंतिम निकाल:
विजेतेपद- एयर इंडिया
उपविजेतेपद- भारत पेट्रोलियम
तिसरा क्रमांक- सेंट्रल बँक आणि जेएसडब्लू रायगड
उत्कृष्ट पकडपटू- शुभम शिंदे (एयर इंडिया)
उत्कृष्ट चढाईपटू- आकाश कदम (एयर इंडिया)
मॅन ऑफ द सिरीज- अजिंक्य कापरे (भारत पेट्रोलियम)