भारतीय कसोटी संघातून बाहेर असलेला स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. या अनुभवी फलंदाजाला 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबईचा कर्णधार बनवण्यात आलंय. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अधिकाऱ्यानं IANS या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.
संघाचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे घोट्याच्या शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे. 29 वर्षीय तुषारनं आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी चमकदार कामगिरी केली होती. याशिवाय त्यानं या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईच्या रणजी ट्रॉफीच्या यशात देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो 23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी संघात सामील होईल अशी अपेक्षा आहे. देशपांडेच्या पुनरागमनामुळे मुंबईच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाला बळकटी मिळेल. सध्या संघात शार्दुल ठाकूर, जुनैद आणि मोहित सारख्या भक्कम वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या अधिकाऱ्यानं IANS ला सांगितलं की, “अजिंक्य रहाणे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आमच्या संघाचं नेतृत्व करेल. तो चांगलं नेतृत्व करत आहे. इराणी चषक तसेच चालू रणजी मोसमात आम्हीला चांगले परिणाम मिळाले. तुषार देशपांडे बंगळुरू येथील एनसीएमध्ये तंदुरुस्त होत आहे. तो रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी परतेल. तुषार, शार्दुल, जुनैद आणि मोहित या प्रमुख खेळाडूंसोबत आम्ही टिकून आहोत.”
मुंबईच्या संघासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पृथ्वी शॉचं पुनरागमन. 25 वर्षीय पृथ्वीनं भारतासाठी 5 कसोटी, 6 एकदिवसीय आणि एक टी20 सामना खेळला आहे. मात्र फिटनेस आणि शिस्तीच्या मुद्द्यांमुळे त्याला मुंबईच्या रणजी संघातून बाहेर ठेवण्यात आलं होतं.
मुंबईचा संभाव्य संघ – पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, जय बिस्टा, श्रीराज घरत, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, सूर्यांश शेडगे, ईशान मूलचंदानी, सिद्देश लाड, हार्दिक तमोरे (विकेटकीपर), आकाश आनंद (विकेटकीपर), साईराज पाटील, आकाश पारकर , शम्स मुलानी, हिमांशु सिंह, सागर छाबडिया, शार्दुल ठाकुर, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूझा, रॉयस्टन डायस, योगेश पाटील, हर्ष तन्ना, इरफान उमैर, विनायक भोईर, कृतिक हनागावडी, शशांक अतार्डे, जुनैद खान
हेही वाचा –
“बुमराह सर्व 5 कसोटी सामने खेळेल असं वाटत नाही”, माजी प्रशिक्षकाचं धक्कादायक वक्तव्य
सीएसकेच्या माजी खेळाडूनं ठोकलं शानदार द्विशतक, शमीनंही दाखवला फलंदाजीत दम
“जग काय मुर्ख आहे…” चॅम्पियन्स ट्राॅफी वादावर माजी पाकिस्तान खेळाडूचे मोठे वक्तव्य!