इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून (१२ ऑगस्ट) सुरु झाला आहे. या सामन्याचा शुक्रवारी (१३ ऑगस्ट) दुसरा दिवस असून, या दुसऱ्या दिवसाची भारतीय संघासाठी अत्यंत खराब सुरुवात राहिली. भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याचा खराब फॉर्म या सामन्यातही कायम राहिला व दिवसातील खेळत असलेल्या पहिल्या चेंडूवर तो जेम्स अँडरसनचा बळी ठरला.
अजिंक्य रहाणेचा खराब फॉर्म कायम
भारतीय संघाने पहिल्या दिवशी दमदार फलंदाजी करत ३ बाद २७६ धावा बनवल्या होत्या. संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे २१ चेंडूंचा सामना करत एका धावेवर नाबाद होता. दुसऱ्या दिवशी त्याच्याकडून २०१४ दौऱ्यासारख्या शतकी खेळीची अपेक्षा भारतीय चाहते करत होते. मात्र, तो यामध्ये अपयशी ठरला.
What a start to the day! 🙌
Scorecard/Clips: https://t.co/GW3VJ3wfDv
🏴 #ENGvIND 🇮🇳 | #RedForRuth pic.twitter.com/Tl0Nb3WXwN
— England Cricket (@englandcricket) August 13, 2021
दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर तो कालच्या धावसंख्येत एकाही धावेची भर न घालता तंबूत परतला. दिवसातील आपला पहिला चेंडू खेळणाऱ्या रहाणेने दिवसातील आपला पहिला चेंडू टाकणाऱ्या अनुभवी जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर पहिल्या स्लिपमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या हाती झेल सोपवला. तत्पूर्वी, कालचा नाबाद शतकवीर केएल राहुल आपल्या कालच्या धावसंख्येत केवळ दोन धावांची भर घालून १२९ धावांवर दिवसातील पहिल्याच षटकात ओली रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर माघारी परतला.
रहाणेवर मोठी खेळी करण्याचा दबाव
कसोटी संघाचा उपकर्णधार असला तरी, अजिंक्य रहाणेवर मोठी खेळी करण्याचा दबाव वाढत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मेलबर्न कसोटीत शानदार शतक झळकावल्यानंतर त्याच्याकडून एकही लक्षवेधी खेळी आलेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत तो चांगली कामगिरी करू शकला नव्हता. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात त्याने ४९ धावांची खेळी केलेली. मात्र, चालू मालिकेतील तो पुन्हा अपयशी ठरला आहे. अनेकांनी त्याच्यासह अनुभवी चेतेश्वर पुजाराला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्याची मागणी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
केरळ सरकारने पीआर श्रीजेशसाठी केली बक्षीसाची घोषणा; इतके कोटी मिळण्याबरोबरच नोकरीतही बढती
हंड्रेड लीगमध्ये फलंदाजाची २५३ च्या स्ट्राईक रेटने तुफान फटकेबाजी, बनल्या तब्बल ‘इतक्या’ धावा