---Advertisement---

इंग्लंडमध्ये रहाणेचे खणखणीत शतक, बांगलादेश मालिकेपूर्वी ठोठावलं टीम इंडियाचं दार!

ajinkya rahane
---Advertisement---

Ajinkya Rahane :- अजिंक्य रहाणे बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. मात्र शतक झळकावून त्याने पुन्हा एकदा भारतीय संघाचे दार ठोठावले आहे. रहाणे सध्या काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन टू 2024 मध्ये खेळत आहे. या स्पर्धेत रहाणे चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. दरम्यान रहाणेने सामन्यात लीसेस्टरशायरसाठी शतक झळकावले आहे. रहाणेने 192 चेंडूंचा सामना करत 102 धावा केल्या. त्याच्या शतकाच्या जोरावर लीसेस्टरशायर संघाने 300 धावांचा पल्ला गाठला. अशाप्रकारे रहाणेने भारत-बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी शतक झळकावले आहे. त्यामुळे त्याच्या भारतीय संघात पुनरागमनाच्या आशा वाढल्या आहेत.

काउंटी चॅम्पियनशिपमध्ये कार्डिफमध्ये लीसेस्टरशायर आणि ग्लॅमॉर्गन यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान लिसेस्टरशायरच्या दुसऱ्या डावात रहाणे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने 192 चेंडूत 102 धावा केल्या. रहाणेने या खेळीदरम्यान 13 चौकार आणि 1 षटकारही लगावला. या शतकानंतर तो सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आहे. एक्स वर रहाणेबाबत अनेक पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत. अनेकांनी रहाणे भारताच्या कसोटी संघात जागेचा हक्कदार असल्याचे म्हटले आहे.

रहाणेने टीम इंडियासाठी शेवटची कसोटी जुलै 2023 मध्ये खेळली होती. या सामन्यानंतर तो भारतीय संघाकडून परत खेळू शकला नाही. आता 19 सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत रहाणेला संधी दिली जाऊ शकते. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. रहाणेने 85 कसोटी सामन्यात 5077 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 12 शतके आणि 26 अर्धशतके केली आहेत. रहाणेची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या 188 धावा आहे.

दुसरीकडे काउंटी चॅम्पियनशीपमधील शतकापूर्वी रहाणे गेल्या तीन डावात काही खास करू शकला नाही. पण त्याआधी त्याने सलग दोन अर्धशतके झळकावली होती. हॅम्पशायरविरुद्ध त्याने 70 धावांची खेळी खेळली. तर ग्लॉसविरुद्ध 62 धावा केल्या होत्या.

हेही वाचा – 

दोन वर्षांनंतर कसोटी शतक! बांगलादेशच्या या फलंदाजानं पाकिस्तानला धो-धो धुतलं
‘हिटमॅन’च्या निशाण्यावर वीरेंद्र सेहवागचा जबरदस्त रेकॉर्ड… बांगलादेश मालिकेत रचणार इतिहास!
भारतीय संघात निवड झाल्यावर राहुल द्रविडचा मुलगा भावूक! म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---