खेळाच्या मैदानावर खेळाडूंमधील चकमक काही नवीन नाही. याच मैदानावर घडणाऱ्या शाब्दिक चकमकीबद्दल (sledging) भारतीय फंलदाज अजिंक्य रहाणेने आपले मत व्यक्य केले आहे.
तो ‘मोटर वाहन विभाग, महाराष्ट्र’ यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत बोलत होता. यावेळी रहाणेने मैदानावरील शाब्दिक चकमकीचे गाड्यांच्या हॉर्न सोबत तुलना केली.
तो याबद्दल म्हणाला ” जसे मला मैदानावर घडणाऱ्या शाब्दिक चकमकी आवडत नाही, तसे गाडी चालवताना हॉर्न वाजवलेला आवडत नाही.” रहाणेच्या या वक्तव्यांमागीतच प्रमुख हेतू असा आहे की, रस्ता सुरक्षा आणि ध्वनी प्रदुषण बद्दल जागृकता निर्माण व्हावी.
” प्रामुख्याने मुंबईसारख्या मोठ्या शहरात ध्वनी प्रदुषण ही गंभीर समस्या आहे. ‘ हॉर्न न वाजवणे ‘ या संकल्पनेचा मी एक भाग असल्याने खूप आनंदी आहे. म्हणुन मी क्रिकेट खेळताना यात मला जेवढे योगदान देता येईल तेवढे देईल,” असेही त्याने पुढे म्हटले.
अजिंक्य रहाणे हा उद्या वानखेडे स्टेडीयमवर होणाऱ्या’ हॉर्न नॉट ओके प्लीज ‘ यांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनीय सामन्यात भाग घेणार आहे. हा सामना ‘ रोड सेफ्टी इलेव्हन ‘ आणि ‘ नो हॉन्कींग इलेव्हन ‘ या दोन संघात होणार आहे. यासाठीच आज रहाणे बोलत होता.
रहाणे बरोबरच आणखी काही भारतीय खेळाडू या सामन्यात खेळणार आहेत. युवराज सिंग, के एल राहुल, दिनेश कार्तिक, शिखर धवन, हरभजन सिंग, हार्दिक पांड्या आणि सुरेश रैना यांचा यात समावेश आहे.
आत्ताच रहाणे मुंबई लीगच्या टी-20 सामन्यात नॉर्थ मुंबई पॅंथर्स फ्रॅंचायझीकडून खेळला. ७ एप्रिलपासून आयपीएलच्या 11व्या हंगामात तो राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. राजस्थान रॉयल्सने आयपीएल लिलावात चार कोटी खर्च करून रहाणेला संघात कायम ठेवण्यासाठी राईट टू मॅच कार्डचा वापर केला होता.