अजिंक्य रहाणे मागच्या मोठ्या काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाहीये. पण त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आणि सध्याचा फॉर्म पाहता भारतीय संघात त्याला संधी मिळावी, अशी अनेकांची इच्छा आहे. रहाणेने आयपीएल 2023 मध्ये सीएसकेसाठी आपला पहिला सामना शनिवारी (8 एप्रिल) खेळला. या सामन्यात त्याने हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. आपल्या या वादळी खेळीनंतर जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (WTC) अंतिम सामन्यासाठी रहाणेचे नाव चर्चेत आले आहे. स्वतः रहाणे देखील या सामन्यात खेळण्यासाठी इच्छुक आहे.
रविवारी मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI vs CSK) यांच्यात आमना-सामना झाला. सीएसकेने या सामन्यात यजमान मुंबईला 7 विकेट्सने मात दिली. विजयात अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याचे योगदान महत्वाचे राहिले. रहाणेने 27 चेंडूत ताबडतोड 61 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 7 चौकार आणि 3 षटकार निघाले. अवघ्या 19 चेंडूत रहाणेने आपले अर्धशतक पूर्ण केले, जे चालू आयपीएल हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक देखील ठरले.
रहाणे आयपीएलमध्ये यापूर्वी मुंबई इंडियन्स, रायजिंग पुणे सुपरजायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग राहिला आहे. यावर्षी पहिल्यांदाच तो एमएस धोनीच्या नेतृत्वातील सीएसकेसाठी खेळला. पहिल्याच सामन्यातील त्याच्या धमाकेदार खेळीनंतर रहाणेचे पुन्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावले आहेत. जुन महिन्यात खेळल्या जाणाऱ्यया डब्ल्यूटीसाच्या अंतिम सामन्यात (WTC Final) भारत आणि ऑस्ट्रेलिया (Indian vs Australia) संघ आमने सामने आहेत. रहाणेचा कसोटीतील अनुभव पाहता त्याला संघात सामील करण्याविषयी संघ व्यवस्थापन आणि निवडर्त्यांना विचार करायला लागू शकतो.
रहाणेला याविषयी प्रश्न विचारला गेल्यानंतर तो म्हणाला, “मी म्हटल्याप्रमाणे मी कधीच माघार घेत नाही. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. मला जेव्हा कधी संधी मिळेल, मी त्या संधीसाठी तयार असेल.” दरम्यान रहाणेच्या कसोटी कारकिर्दीवर एक नजर टाकली, तर त्याने भारतासाठी या फॉरमॅठमध्ये आतापर्यंत 82 सामने खेळले आहेत. 34 वर्षीय दिग्गजाने यादरम्यान 4931 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 12 शतकांचा आणि 25 अर्धशतकांचाही सामावेश आहे. रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका देखील जिंकली आहे. अशात येत्या काळात तो चांगले प्रदर्शन करत राहिला, तर संघात पुनरागमनासाठी तो निवडकर्ते आणि व्यवस्थापनावर दबाव बनवू शकतो. (Ajinkya Rahane is keen for the WTC finals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वारंवार स्क्रीनवर दाखवल्याने संतापली काव्या मारन! कॅमेरामनला उच्चारले अपशब्द, पाहा व्हिडिओ
शाहिद आफ्रिदी विरुद्ध बाबर आझम! कर्णधारपदाविषयी पीसीबी अध्यक्षांनी केला मोठा खुलासा