मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत अजिंक्य रहाणेने ‘कॅप्टन्स इनिंग’ खेळताना भारतीय संघाला आघाडीच्या दिशेने वाटचाल करून दिली. भारताने दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात ५ बाद २६६ धावा केल्या आहेत. दरम्यान भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रहाणेने शतक ठोकत मानाच्या पंगतीत स्थान मिळवले आहे.
रहाणे ठरला चौथा आशियाई कसोटी कर्णधार
भारताकडून पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मयंक अगरवाल भोपळाही न फोडता बाद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्स आणि टीम पेनने मिळून शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांची विकेट काढली. त्यामुळे रहाणे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानावर उतरला.
संघाची परिस्थिती लक्षात घेता रहाणेने बचावात्मक फलंदाजी केली आणि पाहता-पाहता नाबाद १०४ धावांपर्यंत मजल मारली. २०० चेंडूत १२ चौकार ठोकत त्याने ही धावसंख्या गाठली. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हे रहाणेचे दुसरे शतक आहे. याबरोबरच मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर शतकी खेळी करणारा रहाणे आशिया खंडातील चौथा कसोटी कर्णधार आहे.
आजवर विराट कोहली, एमएस धोनी, कपिल देव, सौरव गांगुली अशा सर्वोत्कृष्ट भारतीय कर्णधारांनाही हा किर्तिमान मिळवता आला नाही. रहाणेव्यतिरिक्त केवळ मास्टर ब्सास्टर सचिन तेंडूलकरने हा पराक्रम केला आहे. १९९९ साली मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ११६ धावांसह शतकी खेळी करणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला होता.
सचिन आणि रहाणे व्यतिरिक्त आशिया खंडातील हानिफ मोहम्मद (वर्ष १९६४, धावा १०४) आणि मोहम्मद युसूफ (वर्ष २००४, १११ धावा) या कसोटी कर्णधारांना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर शतकी खेळी करता आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS : रहाणे-जडेजाच्या शतकी भागीदारीच्या जोरावर दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघ ८२ धावांनी आघाडीवर
व्हिडिओ : टीम पेन सर्वच विकेटकिपरला पडला भारी, पंतचा झेल घेत केलाय विश्वविक्रम
व्हिडिओ : नॅथन लायनच्या फिरकीत हनुमा विहारी आडकला, झाला ‘असा’ बाद






