भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. तो त्याच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून बरा झाला असून लवकरच तो मुंबईतील ऑफ-सीझन शिबिरात सहभागी होणार आहे. शिबिरासाठी निवडलेल्या ४७ खेळाडूंच्या यादीत मुंबईच्या निवड समितीने त्याचा समावेश केला आहे. हे शिबिर पुढील आठवड्यात सुरू होणार आहे.
आयपीेल २०२२मध्ये अजिंक्य रहाणेला एका सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. तेव्हापासून तो मैदानाबाहेर होता. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये त्याचे पुनर्वसन सुरू होते. त्याला आता तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) ऑफ सीझन कॅम्पमधून मैदानात परतण्याचा मार्ग निवडला. हे शिबिर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे आयोजित करण्यात येणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियाला मिळणार आणखी एक कर्णधार! आता ‘हा’ खेळाडू सांभाळणार जबाबदारी