अजिंक्य रहाणे याने पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवून दिला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी रहाणेला तब्बल 18 वर्षांनंतर भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. एवढ्या मोठ्या काळानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या रहाणेचे प्रदर्शन संघासाठी सर्वात महत्वाचे ठरले. संघ अडचणीत असताना रहाणे खेळपट्टीवर आला आणि दबावाच्या परिस्थितीत मोठी खेळी केली. अवघ्या 11 धावां कमी पडल्याने त्याचे शतक हुकले. रहाणेच्या 89 धावांमुळे भारताला संघ सुस्थितीत पोहोचला.
पहिल्या डावात भारताची धावसंख्या 261 असताना अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) बाद झाला. भारताने 3 विकेट्सच्या नुकसानावर 50 धावा केल्या होत्या, त्यावेळी रहाणे खेळपट्टीवर आला. विराट कोहलीने (14) विकेट गमावल्यानंतर रहाणेला साथ मिळाली रविंद्र जडेजाची. संघ अडचणीत अशताना रहाणे आणि जडेजा यांच्यात अर्धशतकाची भागीदारी झाली. पुढे जडेजा देखील 48 धावा करून बाद झाला. केएस भरत त्याला चांगली साथ देईल, अशी अपेक्षा होती. मात्र यष्टीरक्षक भरत अवघ्या 5 धावांवर बाद झाला. भारताचा गोलंदाजी अष्टपैलू शार्दुल ठाकूर मात्र तिसऱ्या दिवसी खेळपट्टीवर आल्यानंतर चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. आधीपासून सेट झालेल्या रहाणेसोबत त्याने महत्वपूर्ण भागीदारी केली.
भारतीय संघ अडचणीत असताना महत्वपूर्ण खेळी करणारा रहाणे लवकरच आपले शतक पूर्ण करेल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र, डावातील 62व्या चेंडूत पॅट कमिन्सने त्याची विकेट मिळवली. ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या षटकातील शेवटचा चेंडू रहाणेच्या बॅटला लागून स्लीपमध्ये उफा असलेल्या कॅमरून ग्रीनच्या हाताच गेला. ग्रीनने देखील जराही चूक न करता हा महत्वाचा झेल घेतला. रहाणेने जर आपले शतक पूर्ण केले असते, तर तो डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात भारतासाठी अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू ठरला असता.
अजिंक्य रहाणे () भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने अनेक महत्वाचे सामने आणि मालिका जिंकल्या आहेत. असे असले तरी, जानेवारी 2022 नंतर तो संघातून बाहेर होता. खराब फॉर्ममध्ये त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला होता. पण नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2023 मध्ये त्याने जोरदार पुनरागमन केले. याच पार्श्वभूमीवर राहणेलेला डब्ल्यूटीसी फायनलसाठी संघात निवडले गेले. संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांनी त्याच्यावर दाखवलेला विश्वास रहाणेने सार्थ ठरवला. डब्ल्यूसीटीच्या अंतिम सामन्यात त्याने 129 चेंडूचा सामना करत 89 धावा केल्या. (Ajinkya Rahane missed out on a century in the WTC final by just 11 runs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सिराजने रागाने स्मिथच्या दिशेने चेंडू फेकताच भडकले गावसकर अन् शास्त्री; म्हणाले, ‘हे काय सुरूये?’
अजिंक्य रहाणेचे जबरदस्त कमबॅक! 69 धावा करताच बनला ‘असा’ भीमपराक्रम करणारा 13वा भारतीय