---Advertisement---

भारतीय क्रिकेटर्समध्ये फक्त आणि फक्त अजिंक्य रहाणेच्या नावावर असलेला एक अफलातून विक्रम

On: सोमवार, जून 8, 2020 10:17 AM
---Advertisement---

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या नावावर एक खास विक्रम आहे. भारताकडून आजपर्यंत अनेक क्रिकेटपटू खेळले परंतु तो विक्रम करणारा रहाणे हा एकमेवच.

दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व न्यूझीलंड या ४ देशात कारकिर्दीतील पहिले कसोटी व पहिले वनडे शतक करणारा रहाणे हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. रहाणेने आपले पहिले शतक कसोटी किंवा वनडेत करताना ते या देशांच्या भूमीवर केले आहे.

१४ फेब्रुवारी २०१४ रोजी आपल्या कारकिर्दीतील पाचव्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळताना रहाणेने वेलिंग्टन येथे पहिले कसोटी शतक केले होते. पहिल्या डावात ११८ धावांची खेळी करत त्याने हा कारनामा केला होता. हा सामना पुढे अनिर्णित राहिला होता.

तर वनडेत २ सप्टेंबर २०१४मध्येच बर्मिंग्घमला इंग्लंडविरुद्ध खेळताना रहाणेने १०६ धावांची खेळी केली होती. हे त्याचे वनडेतील पहिले शतक होते. या सामन्यात त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---