गुरूवारपासून सुरू होत असलेल्या भारत-अफगाणिस्तान कसोटी सामन्याचा भाग होणे हा माझा मोठा बहूमान असल्याचे वक्तव्य भारताचा प्रभारी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणेने आयसीसीच्या काल प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्धीपत्रकात केले आहे.
“आफगाणिस्तानसाठी हा कसोटी सामना ऐतिहासिक आहे. या सामन्याचा भारतीय संघ भाग असल्याने मी आनंदी आहे.
अफगाणिस्तान चांगला संघ आहे. त्यांचे खेळाडू प्रतिभावान आहेत. त्यांनी मर्यादित षटकांच्या सामन्यात हे सिद्ध करून दाखवले आहे. मला खात्री आहे की ते कसोटी क्रिकेटमध्येसुद्धा चांगली कामगिरी करतील. भारतीय संघाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो.”
भारतीय संघाचा नियमित कर्णघार विराट कोहली या सामन्यात खेळत नसल्याने अजिंक्य रहाणेकडे या सामन्याचे कर्णधारपद आहे.
गेल्या वर्षी आयर्लंड आणि अफगाणिस्तानला आयसीसीने पूर्णवेळ सदस्यत्व आणि कसोटी संघाचा दर्जा दिला आहे. गेल्या महिन्यात आयर्लंड पाकिस्तानविरूद्द कसोटीमध्ये पदार्पण करत कसोटी खेळणारा 11 वा संघ ठरला. तर गुरूवारी भारताविरूद्ध अफगाणिस्तान कसोटी सामन्यात पदार्पण करत कसोटी खेळणारा 12 वा संघ ठरेल.
अफगाणिस्तानचा कर्णधार असगर स्टेनिकझाई म्हणाला, “भारताविरूद्ध कसोटी सामन्यात पदार्पण करायला मिळणे हा आमचा मोठा सन्मान आहे. या आमच्या नव्या प्रवासाची चांगली सुरूवात करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
त्याचबरेबर भारताविरूद्धच्या सामन्यातून अफगाणिस्तान कसोटी क्रमवारीत 12 वे स्थान मिळवणार आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात प्रभावशाली कामगिरी केलेल्या अफगाणिस्तानच्या खेळाडूंना त्यांच्या वैयक्तिक क्रमवारीत सुधारणा करण्याची मोेठी संधी असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–फिटनेसच्या कारणावरुन मोहम्मद शमीला भारतीय संघातून वगळले, या खेळाडूला मिळाली संधी!
–सेहवागने षटकार मारण्यासाठी पाकिस्तानच्या कर्णधाराला बदलायला लावले क्षेत्ररक्षण!
–२१ वर्षीय क्रिकेटपटूचा सरावादरम्यान दुर्दैवी मृत्यु
–291 कसोटी सामने आणि 33 वर्षांनंतर विंडिज संघाने केला हा कारनामा!





