वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सध्या भारत आणि न्यूझीलंड संघात सुरू आहे. इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर हा सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या पाचव्या दिवशी दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळाले. भारतीय संघाने दुसर्या डावात न्यूझीलंडला २४९ धावांवर सर्वबाद केले. या डावात भारताचा खेळाडू अजिंक्य रहाणेने एक अप्रतिम कॅच घेत लक्ष वेधून घेतले.
रहाणेची स्लिपमध्ये कमाल
या सामन्याच्या पाचव्या दिवसाची सुरुवात झाली तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या २ बाद १०१ अशी होती. भारताच्या पहिल्या डावातील धावसंख्येपासून ते ११६ धावांनी पिछाडीवर होते. यावेळी दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. त्यांनी या सत्रात केवळ ३७ धावा देतांना ३ विकेट्स पटकावल्या. दुसर्या सत्रात न्यूझीलंडने धावांचा वेग वाढवला. मात्र भारतीय गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स घेतल्या.
या डावात ज्यावेळी न्यूझीलंडचा दहाव्या क्रमांकावरील फलंदाज नील वॅगनर फलंदाजीला आला, त्यावेळी भारताचा विराट कोहलीने शक्कल लढवली. वॅगनर डावखुरी फलंदाजी करत असल्याने त्याने ऑफस्पिनर आर अश्विनला गोलंदाजीसाठी आणले. अश्विनने देखील कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत वॅगनरला बाद केले. मात्र या विकेटमध्ये अजिंक्य रहाणेचे मोलाचे योगदान होते. वॅगनरच्या बॅटची कड घेतलेला चेंडू स्लिप जवळून वेगाने चालला होता. मात्र चपळाईने रहाणेने चेंडू पकडला. चेंडू एकदा त्याच्या हातातून निसटला, मात्र दुसर्या प्रयत्नात रहाणेने कॅच पूर्ण करण्यात यश मिळवले.
20:34
What a Catch!!@ajinkyarahane88 #INDvsNZ #IndiaVsNewZealand #IndiaFightsCorona #WTCFinal #2021 pic.twitter.com/GHDnJt9UCx— Aayush Maan Giri (@giri_maan) June 22, 2021
न्यूझीलंडला पहिल्या डावात आघाडी
दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले असले तरी न्यूझीलंडचा संघ ३२ धावांची आघाडी घेण्यात यशस्वी ठरला. भारताच्या पहिल्या डावातील २१७ धावांच्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या न्यूझीलंडचा डाव २४९ धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून सलामीवीर डेवॉन कॉन्वॉयने सर्वाधिक ५४ धावा केल्या. तर भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ४ विकेट्स घेत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.
महत्त्वाच्या बातम्या:
नया हैं यह! शमीने भर मैदानात गुंडाळला टॉवेल, चाहत्यांच्या आल्या अशा प्रतिक्रिया
महिला क्रिकेटसाठी मोठा दिवस! पुरुषांच्या मोठ्या सामन्यात महिला पंच करणार पंचगिरी
व्हिडिओ: विराट कोहलीला भर मैदानात वाजली थंडी, रोहितने दिली मजेदार रिऍक्शन