ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळून भारतात परतलेला भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे मर्यादीत षटकांच्या क्रिकेटपासून दूर आहे. त्याचा ऑस्ट्रलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेतही समावेश करण्यात आलेला नाही. पण आता रहाणे इंडिया ए(भारत अ) या संघाचे नेतृत्व करणार आहे.
भारत दौऱ्यावर येणाऱ्या इंग्लंड लायन्स विरुद्ध इंडिया ए पाच साामन्यांची वन-डे मालिका खेळणार आहे. 23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांचे नेतृत्व रहाणे तर उर्वरीत दोन सामन्यांचे नेतृत्व अंकित बावणे करणार आहे.
रिषभ पंतचाही या मालिकेत समावेश केला असून त्याला शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघामध्ये जागा देण्यात आली आहे.
या मालिकेनंतर 7 फेब्रुवारीला इंग्लंड लायन्सचा संघ बोर्ड प्रेसिडन्ट संघाविरुद्ध चार दिवसांचे दोन सराव सामने खेळणार आहे. इशान किशन हा बोर्ड प्रेसिडन्ट या संघाचे नेतृत्व करणार आहे.
त्रिवेंद्रम येथे ग्रीनफिल्ड आतंरराष्ट्रीय स्टेडिसममध्ये हे पाच वनडे सामने होणार आहेत. तर चार दिवसांचे दोन सराव सामने केरळच्या वयानंद येथे खेळवले जाणार आहे.
इंग्लंड लायन्स विरुद्धच्या पहिल्या तीन वन-डे सामन्यासाठी इंडिया ए चा संघ- अजिंक्य रहाणे (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, रूतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, अंकित बावणे, इशान किशन (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या, अक्षर पटेल, मयंक मरकंडे, जयंत यादव, सिद्धार्थ कौल, शार्दुल ठाकुर, दीपक चहर, नवदिप सैनी
इंग्लंड लायन्स विरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या वन-डे सामन्यासाठी इंडिया ए चा संघ- अंकित बावणे (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, रूतुराज गायकवाड, रिकी भुई, हिमंत सिंग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुडा, राहुल चहर, अक्षर पटेल, जयंत यादव, नवदिप सैनी, दीपक चहर, शार्दुल ठाकुर
इंग्लंड लायन्स विरुद्धच्या चार दिवसांच्या दोन सराव सामन्यांसाठी बोर्ड प्रेसिडन्टचा संघ- इशान किशन (कर्णधार, यष्टीरक्षक), अक्षत रेड्डी, ध्रुव शोरे, रिकी भुई, सिद्धेश लाड, रिंकू सिंग, प्रियम गर्ग, सौरभ कुमार, राहुल चहर, जयंत यादव, अनिकेत चौधरी, राजेश मोहंती
महत्त्वाच्या बातम्या-
–तेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील
–न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया