चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना चालू आहे. आज (१४ फेब्रुवारी) या सामन्याचा दुसरा दिवस असून भारताने सामन्यावर आपले वर्चस्व कायम राखले आहे. भारतीय संघाच्या पहिल्या डावातील ३३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचे आघाडीचे ६ फलंदाज पटापट बाद झाले. त्यानंतर बेन फोक्स आणि मोईन अली सावध फलंदाजी करत मैदानावर स्थिरावले असताना अजिंक्य रहाणेने मोईनचा शानदार झेल पकडत त्यांची भागिदारी मोडली.
त्याचे झाले असे की, भारताचा कर्णधार विराट कोहलीने पदार्पणवीर अक्षर पटेलच्या हाती ४९ वे षटक सोपवले. अक्षरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोईनने हलकासा शॉट मारला. यष्टीमागे उभा असलेल्या रिषभ पंतला त्याचा चेंडू पकडता आला नाही. परंतु पंतच्या मागे स्लिपमध्ये क्षेत्ररक्षणासाठी थांबलेल्या रहाणेने चित्त्याच्या चपळाईने हवेत सूर मारत दोन्ही हातांनी अप्रतिम झेल पकडला.
अशाप्रकारे मोईनच्या रुपात भारताला सातवी विकेट मिळाली. ३० चेंडूत एका षटकाराच्या मदतीने अवघ्या ६ धावांवर मोईन हताश होऊन पव्हेलियनला परतला.
https://twitter.com/cxn_amir/status/1360871839354875905?s=20
मोईनपाठोपाठ पुढील षटाकतील दुसऱ्या चेंडूवर ओली स्टोनही आपला झेल देऊन बसला. ४ चेंडूत केवळ १ धाव करत त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला. अखेर यष्टीरक्षक फलंदाज बेन फोक्स विकेट वाचवून डावास चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. फिरकीपटू जॅक लीचदेखील त्याला यशस्वी साथ देत आहे.
तिसऱ्या सत्रापर्यंत इंग्लंडने ८ विकेट्सच्या नुकसानानंतर १२४ धावा फलकावर नोंदवल्या आहेत. इंग्लंडला पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी अजून जवळपास २०० धावांचा डोंगर सर करायचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
व्हिडिओ : स्टोक्स पुन्हा ठरला अश्विनची शिकार, जादूई फिरकीवर झाली दांडी गुल
इंग्लंडचा संघ अवघ्या दिडशे धावसंख्येवर होणार ऑलआऊट; दिग्गजाने केली भविष्यवाणी