मुंबई | काल नाॅर्थ मुंबई पॅंथर विरुद्ध शिवाजी पार्क लायन्स सामन्यात नाॅर्थ मुंबई पॅंथरने ५ विकेट्सने विजस मिळवला. प्रथम फलंदाजी करताना शिवाजी पार्क लायन्सने २० षटकांत ९ बाद १३५ धावा केल्या. हा धावांचा पाथठलाग करताना नाॅर्थ मुंबई पॅंथरने १९.४ षटकांत ५ खेळाडू गमावत १३८ धावा केल्या.
हा सामना संपल्यावर जेव्हा भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार तसेच टी२० मुंबई लीगमध्ये नाॅर्थ मुंबई पॅंथर धुरा वाहणारा अजिंक्य रहाणे पुन्हा पॅव्हिलिअनमध्ये जात होता तेव्हा ‘नॉर्थ स्टँड गॅंग’ च्या चाहत्यांच्या इच्छेखातर रहाणेने त्या चाहत्यांना सह्या दिल्या तसेच त्यांच्याबरोबर सेल्फीही काढले.
‘नॉर्थ स्टँड गॅंग’ ही वानखेडे स्टेडीयमरील फॅन अार्मी असून ती भारतीय संघ आणि खासकरुन मराठी खेळाडूंना जोरदार पाठींबा देते. ते सोशल मिडीयावरही अॅक्टिव फॅन क्लब म्हणून ओळखले जातात.
काल त्यांनी अजिंक्य रहाणेचा मोठा बॅनर आणला होता. यावर रहाणेने चाहत्यांसाठी खास संदेश दिला.
महेश बबन शिंदे नावाच्या एका चाहत्याने हा विडीओ शेअर केला आहे. ” अजिंक्यने आज मन जिंकलं..आम्ही त्याला आवाज दिला आणि तो आला.म्याच संपल्यावर आमच्या नॉर्थ स्टँड गॅंगच्या बॅनरवर मेसेज आणि साइन दिलं… जमिनीशी नाळ जोडलेला एकदम साधा आणि सच्चा खेळाडू.. धन्यवाद अज्जू” असे तो चाहता अापल्या ट्वीटमध्ये म्हणतो.
विडीओ:
https://twitter.com/Mahesh_no1/status/974358521075478528
Thank you for the autograph @ajinkyarahane88 ! That was indeed sweet of you 🙂 pic.twitter.com/MlsmgQE98X
— North Stand Gang – Wankhede (@NorthStandGang) March 15, 2018