अजिंक्य रहाणेकडे (Ajinkya Rahane) कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी अजिंक्य रहाणेला मुंबईच्या रणजी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. रणजी ट्राॅफीची (Ranji Trophy) पुढची फेरी (23 जानेवारी) पासून सुरू होणार आहे. रहाणेच्या नेतृत्वाखालील 17 सदस्यीय संघात रोहित शर्माचीही (Rohit Sharma) निवड झाली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आपल्या पुढच्या सामन्यात जम्मू-काश्मीरशी भिडणार आहे.
आज, (20 जानेवारी) यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतची (Rishabh Pant) लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता रहाणेला रोहित शर्मा (Rohit Sharma), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), शिवम दुबे (Shivam Dube), यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांच्यासह मुंबईचा कर्णधार बनवण्यात आले आहे. जर मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर रहाणेला कोलकाता नाईट रायडर्सचे (Kolkata Knight Riders) कर्णधारपदही मिळू शकते.
रोहित शर्मा (Rohit Sharma) 10 वर्षांनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार हे देखील निश्चित झाले आहे. त्याची देखील मुंबईच्या 17 सदस्यीय संघात निवड झाली. रोहित मैदानावर उतरताच इतिहास रचला जाईल. खरे तर, 17 वर्षांनंतर एक भारतीय कर्णधार रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. याआधी, शेवटचे हे सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) केले होते. तेव्हा गांगुली भारतीय संघाचा कर्णधार होता.
रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीसाठी मुंबई संघ- अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तामोर (यष्टीरक्षक), आकाश आनंद (यष्टीरक्षक), तनुश कोटियन, शम्स. मुलानी, हिमांशू सिंग, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूझा, रॉयस्टन डायस, कार्श कोठारी
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; ‘या’ 3 कारणांमुळे लखनऊने केलं रिषभ पंतला कर्णधार..!
IPL 2025; LSGचा कर्णधार झाल्यानंतर रिषभ पंतला आली धोनीची आठवण! म्हणाला…
IPL 2025; लखनऊ सुपर जायंट्सला मिळाला नवा कर्णधार, संघ मालकाची मोठी घोषणा