भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने 10 वर्षांपूर्वी म्हणजेच, 31 ऑगस्ट 2011 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला गेलेला टी-20 सामना हा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना ठरला. त्याने या पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. तो सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून भारतीय संघाकडून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये रहाणेची कामगिरी चांगली राहिलेली नाही आणि याच कारणामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, रहाणेची पत्नी राधिका धोपवकरने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. राधिकाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रहाणेच्या पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण झाल्याने ही पोस्ट केली आहे. पण त्याचबरोबर तिने रहाणेच्या टीकाकारांनाही लक्ष्य केले आहे.
राधिकाने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की, ‘बघता बघता 10 वर्षे झाली! ती वर्षे कशी गेली, मला कळलेही नाही. सकाळी 5 वाजता मुंबईत लोकल ट्रेनचा प्रवास, स्थानिक क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षांची मेहनत आणि नंतर पहिली आंतरराष्ट्रीय कॅप मिळवण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा. हे सर्व वाट पाहण्यासारखे आहे, अजिंक्य! तू अनेक चढ-उतारातून गेला आहेस. तुझ्यात सर्व अडचणींशी लढत राहण्याचे धैर्यही तेवढेच आहे. आतापर्यंतच्या या प्रवासात तू आम्हा सर्वांना अभिमान वाटेल असेच काम करत आला आहेस, मी आता आणि नेहमी तुझ्यासोबत राहून मी खूप आनंदीत आहे.’
https://www.instagram.com/p/CTOx57zjeoP/?utm_source=ig_web_button_share_sheet
अजिंक्य रहाणे सध्या खराब फॉर्मात आहे. त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ आटला आहे. रहाणेने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या तीन कसोटींच्या पाच डावांमध्ये केवळ 95 धावा केल्या आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. दोन्ही संघांमधील मालिकेची चौथी कसोटी 2 सप्टेंबरपासून लंडनमध्ये खेळली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतासाठी खुशखबर! फलंदाजांना जेरीस आणणारा इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज ओव्हल कसोटीतून होऊ शकतो बाहेर
भारतापासून सावधच राहा! ऍडलेड कसोटीची आठवण करुन देत माजी इंग्लिश कर्णधाराचा यजमानांना इशारा