भारताच्या वरिष्ठ निवड समीतीच्या अध्यक्षपदासाठी (Team India Chief Selector) बीसीसीआयने (BCCI) अर्ज भरण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी ठेवली होती. या पदासाठी भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरनेही राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. त्यामुळे आता तोही अध्यक्ष बनण्याच्या शर्यतीत सहभागी झाला आहे.
याबद्दल बीसीसीआयच्या (BCCI) एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “अजितची निवडकर्त्याच्या शर्यतीत भाग घेणे हे एक मनोरंजक घटना आहे. तो एक असा व्यक्ति आहे ज्याने अर्ज करण्यापूर्वी खूप विचार केला असेल. जर कोणाला वाटत असेल की, लक्ष्मण शिवरामकृष्णनचे निवडसमितीचा अध्यक्ष बनने निश्चित असेल तर अजितने यावर विचार केला पाहिजे. निवडकर्ता म्हणून कोणाला निवडले जाते, हे पाहणे मनोरंजक असेल.”
हरियाणाचे चेतन शर्मा, बडोद्याचे नयन मोंगिया, तामिळनाडूचे शिवरामकृष्णन, अमेय खुरासिया आणि मध्यप्रदेशचे राजेश चव्हाण यांनी मुख्य निवडकर्ता पदासाठी अर्ज केला आहे.