ऑकलँड | शुक्रवारी (24 जानेवारी) 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील (5 Matches of T20 Series) पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 6 विकेट्सने विजय (Won by 6 Wickets) मिळवला. तसेच मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. या सामन्यानंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) आपल्या फलंदाजी आणि यष्टीरक्षणाबद्दल भाष्य केले आहे.
“मला यष्टीरक्षण करायला आवडते. कारण यामुळे खेळपट्टीचा अंदाज मिळतो. तसेच याच्याशी निगडीत माहिती मी गोलंदाज आणि विराटला देतो. त्यामुळे विराट त्यानुसार क्षेत्ररक्षणात बदल करतो,” असे आपल्या यष्टीरक्षणाबद्दल बोलताना राहुल म्हणाला.
“एक फलंदाज म्हणूनही 20 षटकांपर्यंत यष्टीरक्षण केल्यानंतर तुम्हाला अंदाज येतो की खेळपट्टीवर शॉट कशाप्रकारे खेळला पाहिजे. मी या जबाबदारीचा आनंद घेत आहे,” असेही राहुल यावेळी म्हणाला.
शुक्रवारी झालेल्या सामन्यात राहुलने उत्कृष्ट फलंदाजी करत 27 चेंडूत 56 धावा केल्या.
काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) झालेल्या वनडे मालिकेत भारताचा नियमित यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) दुखापतग्रस्त झाल्यामुळे राहुलने यष्टीरक्षकाची जबाबदारी सांभाळली. यावेळी राहुलने यष्टीमागे आणि फलंदाजीतही चांगली कामगिरी केली. यानंतर विराटने राहुलला यष्टीरक्षक म्हणून न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी20 साठीही कायम केले.
भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटर २६ जानेवारीला करणार वयाची खणखणीत सेंच्युरी
वाचा- ????https://t.co/8bGOcxiXem????#म #मराठी #Cricket #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) January 25, 2020
काय सांगता! एकट्या इंग्लंड संघाने केल्यात तब्बल ५ लाख धावा…
वाचा????https://t.co/kYt0bRdmp0????#म #मराठी #Cricket #SAvENG— Maha Sports (@Maha_Sports) January 25, 2020






