मागील अनेक दिवसांपासून युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत त्याच्या खराब कामगिरीमुळे चर्चेत आहे. तो अनेकदा चूकीचे फटके मारुन बाद होत असल्याने त्याच्यावर अनेकांनी टीका केली आहे. पण भारताचा माजी क्रिकेटपटू अजित अगरकरने पंतला पाठिंबा दिला आहे.
अगरकर इसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाला, ‘मला विश्वास बसत नाही की ज्याने भारताबाहेर दोन कसोटी शतके केली आहेत आणि जो परिणामकारण खेळी करु शकतो त्याच्याबद्दल एवढी चर्चा होत आहे.’
‘टी20 मध्ये कधीकधी तूम्ही अडचणीत येता कारण तूम्हाला फटकेबाजी करायची असते. पण कदाचीत पंतला त्याला अपेक्षित अशी अंबलबजावणी करता येत नसावी.’
तसेच अगरकरने पंतकडून काय हवे आहे हे ठरवणे गरजेचे आहे असे म्हटले असून श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी पाठवण्यासही सुचवले आहे.
तो म्हणाला, ‘कदाचीत श्रेयस अय्यर, जो चांगल्या लयीत आहे, तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो आणि पंतला नंतर फलंदाजीला पाठवून त्याचा खेळ खेळण्याचे स्वातंत्र्य देता येऊ शकते. त्याचा दबाव भारत हटवू शकतो. जो खेळाडू त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सध्या खूप युवा आहे, त्याच्यावर अनावश्यक दबाव टाकला जात आहे. तो भारतासाठी सामने जिंकवू शकतो.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–‘हिटमॅन’ रोहित शर्माला धोनीच्या टी२०मधील सर्वात मोठ्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी
–विराट कोहली-रोहित शर्मामधील ही खास शर्यत जिंकणार कोण?
–केवळ ३ भारतीयांचा समावेश असणाऱ्या या यादीत सामील होण्यासाठी धवन केवळ ४ धावा दूर